ठाणे

Ulhasnagar : किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने नाक, कपाळाजवळ, दोन्ही हातांवर आणि डोक्याच्या मागील बाजूस वार करून त्याला गंभीर जखमी केले.

Swapnil S

उल्हासनगर : शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादाचा राग मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना उल्हासनगर-४ येथील सुभाष टेकडी परिसरात घडली. दुपारच्या क्षुल्लक भांडणाचा सूड उगवण्यासाठी रात्री उघड्या मैदानात हा जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ही घटना सिद्धार्थ मंडळाजवळील मोकळ्या मैदानात घडली. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा भाऊ रोहित याला शिवीगाळ करत अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने नाक, कपाळाजवळ, दोन्ही हातांवर आणि डोक्याच्या मागील बाजूस वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी रोहितवर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते. या प्रकरणी ऋषिकेश जगदाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सुमित सदावर्ते (१९) व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद