ठाणे

Ulhasnagar : फाळणीच्या वेदनांतून उभारीचा प्रवास; सिंधी समाजाचा संघर्ष रंगमंचावर जिवंत

फाळणीच्या जखमा आजही इतिहासाच्या पानांत जिवंत असताना, मातृभूमी सोडण्याची वेदना, विस्थापनाचा संघर्ष आणि शून्यातून उभे केलेले नवे आयुष्य यांचा भावस्पर्शी प्रवास उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये रंगमंचावर साकारला.

Swapnil S

उल्हासनगर : फाळणीच्या जखमा आजही इतिहासाच्या पानांत जिवंत असताना, मातृभूमी सोडण्याची वेदना, विस्थापनाचा संघर्ष आणि शून्यातून उभे केलेले नवे आयुष्य यांचा भावस्पर्शी प्रवास उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये रंगमंचावर साकारला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्यावतीने भारत विभाजनाच्या विभीषिकेच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विशेष सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमातून सिंधी समाजाचा त्याग, जिद्द आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला.

‘मस्वाड़ी’ नाटकाने केले प्रेक्षकांवर गारुड

सिंधी कलाकार संगमच्या कलाकारांनी प्री-रेकॉर्डेड ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणासह लाइव्ह अभिनय, संवाद, गीत-संगीत आणि ‘मस्वाड़ी (मालकी-अ खां महरूम)’ या नाटकातून फाळणीच्या काळातील सिंधी समाजाच्या वेदना जिवंत केल्या. घरदार, संपत्ती आणि मातृभूमी मागे सोडून नव्या भूमीत पुन्हा आयुष्य उभारणाऱ्या समाजाच्या संघर्षाचे दर्शन उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. कार्यक्रमाला आमदार कुमार अयलानी, महापौर अश्विनी निकम, महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, दादा लाधाराम नागवानी, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे माजी कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, नीतू सुखरामानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त मनीषा आव्हाळे आणि महापौर अश्विनी निकम यांना त्यांच्या पेंटिंगची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

संघर्षातून उभे केले यशाचे साम्राज्य

फाळणीच्या काळात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सिंधी समाजाने आपली कर्मभूमी, घरदार आणि संपत्ती मागे सोडत विस्थापनाच्या असह्य वेदना सहन केल्या. मात्र, या संकटापुढे हार न मानता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नव्या भूमीत शून्यातून आयुष्य उभे करण्याची असामान्य जिद्द सिंधी समाजाने दाखवली, अशा शब्दांत महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी समाजाच्या संघर्षाचे कौतुक केले. आज शिक्षण, व्यापार, उद्योग, कला आणि विविध क्षेत्रांत सिंधी समाजाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. विस्थापनाच्या वेदनांना सामर्थ्यात बदलून प्रगतीचा मार्ग निर्माण करणाऱ्या या समाजाचे यश हे त्यांच्या अथक मेहनतीचे, संघर्षाचे आणि जिद्दीचे प्रतीक असल्याचे आव्हाळे यांनी नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडणार; सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांची माहिती

पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव

BMC सफाई कर्मचाऱ्यांच्या मोफत घरांचा प्रश्न ऐरणीवर; उपलब्ध जमिनीचा विस्तृत तपशील सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

घरगुती PNG वापराला प्रोत्साहन; सरकार शहर वायू वितरण कंपन्यांना अतिरिक्त गॅस देणार

Mumbai : ६३८ आस्थापनांना न्यायालयात खेचले; मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष भोवले; शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर