सोसायटी व्हाॅट्सॲप ग्रुपमधील वाद थेट रस्त्यावर; मारहाण सीसीटीव्हीत कैद  
ठाणे

सोसायटी व्हाॅट्सॲप ग्रुपमधील वाद थेट रस्त्यावर; उल्हासनगरमध्ये बाप-लेकावर हल्ला, मारहाण सीसीटीव्हीत कैद

सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील किरकोळ वाद थेट रस्त्यावरच्या रक्तरंजित हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर–५ येथील भाटिया हॉस्पिटल परिसरात रविवारी रात्री घडली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या मारहाणीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील किरकोळ वाद थेट रस्त्यावरच्या रक्तरंजित हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर–५ येथील भाटिया हॉस्पिटल परिसरात रविवारी रात्री घडली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या मारहाणीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी गुलाब मोटवानी यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून गुरमुख वलेचा व त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर–५ येथील रहिवासी गुलाब मोटवानी यांच्यावर गुरमुख वलेचा व त्यांच्या दोन मुलांनी मिळून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान गुरमुख वलेचा यांनी गुलाब मोटवानी आणि त्यांच्या परिवाराविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

उल्हासनगरमध्ये बाप-लेकावर हल्ला

रविवारी रात्री गुरमुख वलेचा हे आपल्या पत्नी आणि मुलासह भाटिया हॉस्पिटल परिसरातील गुलाब मोटवानी यांच्या घरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून गुलाब मोटवानी यांचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचला. मात्र, त्याचवेळी गुरमुख वलेचा व त्यांच्या दोन्ही मुलांनी गुलाब मोटवानी यांच्या मुलावर थेट हल्ला केला. वडील गुलाब मोटवानी हे भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावले असता, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही दगडाने हल्ला केला. या झटापटीत गुलाब मोटवानी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या मुलाच्या कानाच्या मागील भागाला जखम झाली आहे. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

'समृद्धी'वर अपघात : ७ ठार, १९ जखमी; अमरावतीत ट्रकची पिकअप व्हॅनला धडक

दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

सुवर्णपदकाच्या मार्गात पाकिस्तानचा अडथळा! श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाची आज अंतिम परीक्षा