ठाणे

Video : ‘एस्क्यूज मी’ वरून दोन महिलांना मारहाण; डोंबिवलीत अदखलपात्र गुन्हा दाखल

'एस्क्यूज मी' या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथे घडली.

Swapnil S

डोंबिवली : 'एस्क्यूज मी' या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथे घडली. या प्रकरणी महिलेसोबत तिच्या पतीला तसेच दोन मैत्रिणींनींही भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ सामाजिक माध्यमात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवलीतील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पूनम अंकित गुप्ता या सोमवारी त्यांच्या मैत्रिणीसोबत घराकडे जात होत्या.

इमारतीच्या बाहेरील रस्त्यावर उभे असलेल्या काही जणांना बाजूला होण्यासाठी त्यांनी 'एस्क्यूज मी' असे उद्गार काढताच पूनम आणि त्यांच्या मैत्रिणींना अनिल पवार, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बचावासाठी पूनम व दुसऱ्या मैत्रिणी त्या ठिकाणी आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार