रवींद्र चव्हाण  संग्रहित छायाचित्र
ठाणे

डोंबिवली : ‘त्या’ ६५ इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही; भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण

डोंबिवलीतील त्या ६५ इमारतीमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही व सर्व रहिवाश्यांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली.

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवलीतील त्या ६५ इमारतीमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही व सर्व रहिवाश्यांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली. या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या चार दिवसात चारही विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल व या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार १९ तारखेला मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६५ इमारतीसंदर्भातील एक महत्त्वाची बैठक बुधवार १९ तारखेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला रविंद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेच आय़ुक्त, ठाणे,रायगड, पालघऱ व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी व्हीसी द्वारे उपस्थित होते.

यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, त्या ६५ इमारतीमधील एकही रहिवासी बेघर होऊ देणार नाही. हा विषय गंभीर आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवली आयुक्त, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी व महारेरा या चारही विभागांशी संबधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या विषयासंदर्भात सविस्तर माहिती सादर करावी. या विषयावर तोडगा काढताना एक विशेष प्रकरण म्हणून तोडगा काढण्यात यावा. तसेच या हजारो रहिवाश्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सकारात्मक मार्ग काढण्याची भूमिका चव्हाण मांडली.

उल्हासनगर पॅटर्नप्रमाणे तोडगा काढावा

६५ इमारतीमधील रहिवाश्यांची घरे ही त्यांची हक्काची घरे आहेत त्यामुळे या हजारो रहिवाश्यांच्या डोक्यावरील छप्पर हे कायम राहिले पाहिजे असे स्पष्ट करताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, उल्हासनगरमध्ये सुध्दा असाच प्रश्न उपस्थित झाला होता, पण त्यावेळी शासन दरबारी कायदेशीर मार्ग काढण्यात आला होता. त्यामुळे या विषयातही उल्हासनगर पॅटर्नप्रमाणे सकारात्मक तोडगा काढावा.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार