
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १८,५४० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्यावर्षी कंपनीला याच कालावधीत १७,२६५ कोटी रुपये नफा मिळाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ७.३८ टक्क्यांची वाढ झाली.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कंपनीचा महसूल २.४४ लाख कोटी झाला आहे. गेल्यावर्षी कंपनीला याच काळात २.२८ लाख कोटी रुपये महसूल मिळाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महसूलात ७ टक्के वाढ झाली.
जिओला ६,८६१ कोटी नफा
रिलायन्स जिओला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ६,८६१ कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्यावर्षी कंपनीला ५,४४७ कोटी रुपये नफा झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २६ टक्के अधिक वाढ झाली. तर कंपनीचा महसूल ३३,०७४ कोटी रुपये झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत महसूल २७,६९७ कोटी रुपये होता.