महिला गृह खरेदीदारांना मुंबईतील प्रदर्शनामध्ये २ लाखांची अतिरिक्त सवलत; क्रेडाई MCHI ची माहिती

महिला गृह खरेदीदारांना रु. २ लाखांपर्यंत अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. १७-१९ जानेवारीदरम्यान मुंबईतील मालमत्ता प्रदर्शनात बिल्डर्सनी ऑफर केली आहे, अशी माहिती रिअलटर्स संघटना क्रेडाई-एमसीएचआयने दिली.
क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमिनिक रोमेल
क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमिनिक रोमेलसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महिला गृह खरेदीदारांना रु. २ लाखांपर्यंत अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. १७-१९ जानेवारीदरम्यान मुंबईतील मालमत्ता प्रदर्शनात बिल्डर्सनी ऑफर केली आहे, अशी माहिती रिअलटर्स संघटना क्रेडाई-एमसीएचआयने दिली.

क्रेडाई-एमसीएचआयची ही संस्था मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआरमधील २,१०० हून अधिक रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे प्रतिनिधित्व करते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ३२ व्या प्रॉपर्टी आणि होम फायनान्स एक्स्पोचे आयोजन करत आहे. प्रदर्शनामध्ये १०० पेक्षा जास्त विकासक सहभागी होतील, ५ हजारपेक्षा जास्त ठिकाणी ५०० पेक्षा जास्त प्रकल्प प्रदर्शित करतील. हे विकासक प्रत्येक गरजा आणि बजेट पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या गृहनिर्माण पर्याय सादर करतील. याव्यतिरिक्त, २५ पेक्षा जास्त वित्तीय संस्था गृह वित्तपुरवठा उपाय सुलभ करण्यासाठी उपस्थित राहतील.

क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमिनिक रोमेल म्हणाले, या वर्षीचा एक्स्पो घर खरेदी सुलभ करण्यासाठी एक मैलाचा दगड आहे. क्विक रिअल इस्टेट मॉलमधील ‘१० मिनिटांत आपले घर बुक करा’ उपक्रम ही प्रक्रिया सुलभ करते, खरेदीदारांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करते.

महिलांसाठी १९ जानेवारीला ‘पिंक संडे’

पहिल्यांदाच १९ जानेवारी रोजी एक्स्पो ‘पिंक संडे’ आयोजित करेल, जो महिलांना त्यांच्या स्वतःच्या नावावर घरे खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्याचा एक उपक्रम आहे. क्रेडाई-एमसीएचआय स्त्री आवास योजनेंतर्गत घर खरेदी करणाऱ्या महिलांना क्रेडाई-एमसीएचआयकडून रु. २ लाखांसह सहभागी विकासकांनी प्रदान केलेल्या ऑफर व्यतिरिक्त जास्तीत जास्त सवलतीचा लाभ घेता येईल. विशेष ऑफर केवळ प्रदर्शनामध्ये ‘पिंक संडे’ म्हणजे रविवारी केलेल्या होम बुकिंगसाठी वैध आहे, असेही ते म्हणाले. क्रेडाई-एमसीएचआयचे सचिव धवल अजमेरा यांनी सांगितले की, प्रदर्शनात गृहखरेदीदारांना स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी असणार नाही आणि १८ लाख रुपयांपर्यंतच्या सवलती असे विशेष विशेष व्यवहार होतील.

logo
marathi.freepressjournal.in