'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

Maruti Suzuki WagonR : फक्त 6 लाखांची ही कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा...
'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

मुंबई : भारतामध्ये गेल्या काही वर्षांत कार विक्रीत मोठी वाढ झाली आहे. जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा बहुतेक लोक कमी बजेटमध्ये चांगलं मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात. तुम्हीही जर अशी कार शोधत असाल, तर मारूती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki WagonR) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

मारूती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki WagonR) ही हॅचबॅक भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीच्या कार देशात नेहमीच अव्वल स्थानावर राहतात. परवडणारी किंमत, उत्तम मायलेज आणि कमी देखभाल खर्च या गोष्टींमुळं मारुती सुझुकीच्या इतर कारप्रमाणंच ही कारही मध्यमवर्गीय लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मारुती 800 आणि अल्टो नंतर कंपनीच्या लाइनअपमध्ये वॅगन आर ही सर्वात लोकप्रिय कार आहे. मारुती सुझुकी वॅगन आर पहिल्यांदा 1999 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च झाली होती.

Maruti suzuki Wagon R ची वैशिष्ट्ये:

भारतीय बाजारात या कारची किंमत 5.54 लाख रुपयांपासून ते 7.38 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हाय ग्राउंड क्लीयरन्स असून आणि पुरेशा बूट स्पेसमुळं या कारमध्ये बऱ्यापैकी सामान नेता येऊ शकतं. ही कार नियमित वापरासोबतच लांबच्या प्रवासासाठीही उत्तम आहे. सेल्स रिपोर्टनुसार मारुती प्रत्येक महिन्याला Wagon R ची साधारणपणे 15 हजार युनिट सेल करते. मारुती वॅगनआरची रिसेल वॅल्यूही चांगली आहे. सेकंड हँड मार्केटमध्येही अनेकजण ही कार खरेदी करत आहेत.

जबरदस्त मायलेज:

Wagon R च्या मायलेजबद्दल सांगायचं झाल्यास, कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार पेट्रोल इंजिनवर 23 ते 25 किलोमीटरचं मायलेज देण्यास सक्षम आहे. तर CNG मध्ये कार 35 Kmpl पर्यंत मायलेज देते.

मारुती सुझुकी वॅगन आर ची वैशिष्ट्ये:

फिचर्सचा विचार करता, कारमध्ये चार स्पीकरसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, म्युझिक सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स आणि स्मार्टफोन नेव्हिगेशन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी वॅगन आर पॉवरट्रेन:

या कारच्या इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास ते 1.0 लीटर K सीरीज इंजिननं सुसज्ज आहे. तर तिच्या N टॉप मॉडेलमध्ये 1.2-लिटर इंजिन आहे. याशिवाय मारुती वॅगन आर 1.0 लीटर CNG पर्यायासह येते.

कारचे 1.2-लिटर पेट्रोल इंजिन 88.5 bhp पॉवर आणि 113 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. वॅगन आर एकूण चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ती CNG पर्यायात देखील खरेदी करू शकता. प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांसाठी वॅगन आर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in