जन्माष्टमीच्या दिवशी देशात २५ हजार कोटींचा व्यवसाय, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी-कॅट) च्या म्हणण्यानुसार, जन्माष्टमी उत्सवादरम्यान देशभरात २५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.
जन्माष्टमीच्या दिवशी देशात २५ हजार कोटींचा व्यवसाय, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज
PTI
Published on

नवी दिल्ली : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी-कॅट) च्या म्हणण्यानुसार, जन्माष्टमी उत्सवादरम्यान देशभरात २५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. व्यवहाराची ही उलााढाल पाहता जन्माष्टमीच्या उत्साही उत्सवादरम्यान ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणशवर खर्च केल्याचे दिसून येते. हा वर्षातील सर्वात व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय सणांपैकी एक आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत असून लोकांमध्ये सणाची प्रचंड उत्सुकता आहे, असे व्यापारी संघटनेने सांगितले.

सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि नवी दिल्लीच्या चांदणी चौकातील खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या महत्त्वाच्या सणादरम्यान विशेषत: फुले, फळे, मिठाई, देवताचे पोशाख, सजावटीच्या वस्तू, उपवासाचे पदार्थ, मिठाई, दूध, दही, लोणी आणि सुका मेवा विकला जातो. या वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आली.

खंडेलवाल म्हणाले की, जन्माष्टमीसारखे सण हे सनातनच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी देशभरात साजरी करण्यात आली. भक्त परंपरेने व्रत पाळतात आणि मंदिरे आणि घरे फुले, दिवे आणि दिव्यांनी सजवतात. मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली असून तेथे दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांनी माहिती दिली की जन्माष्टमी उत्सवाच्या विशेष आकर्षणांमध्ये डिजिटल टॅबल्स, भगवान कृष्णासोबत सेल्फी पॉइंट आणि इतर अनेक मनोहारी देखावे आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला ‘कॅट’ने राखी पौर्णिमेच्या सणाच्या वेळी देशभरात सणासुदीच्या व्यापाराचा अंदाज १२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला होता. खंडेलवाल यांच्या मते, राखी सणाचा व्यवसाय २०२२ मध्ये सुमारे ७ हजार कोटी रुपये, २०२१ मध्ये ६ हजार कोटी रुपये, २०२० मध्ये ५ हजार कोटी रुपये, २०१९ मध्ये ३,५०० कोटी रुपये आणि २०१८ मध्ये ३ हजार कोटी रुपये झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in