एनएचएआयकडून ५६ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड; राज्य सरकारांची १२०० कोटींची बचत होणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) चालू आर्थिक वर्षात ५६ हजार कोटी रुपयांची मुदतपूर्व कर्जे फेडल्याने राज्य सरकारची सुमारे १,२०० कोटी रुपयांच्या व्याज खर्चात बचत होण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.
एनएचएआयकडून ५६ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड; राज्य सरकारांची १२०० कोटींची बचत होणार
संग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) चालू आर्थिक वर्षात ५६ हजार कोटी रुपयांची मुदतपूर्व कर्जे फेडल्याने राज्य सरकारची सुमारे १,२०० कोटी रुपयांच्या व्याज खर्चात बचत होण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एनएचएआयचे एकूण कर्ज ३.३५ लाख कोटी रुपये होते, जे २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी सुमारे २.७६ लाख कोटी रुपये होते.

ते पुढे म्हणाले की, InvIT कमाईतून सुमारे १५,७०० कोटी रुपये प्री-पेमेंट केले गेले आहेत, तर ४० हजार कोटी रुपयांचे नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंड (३० हजार कोटी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (१० हजार कोटी) यांना दिलेले कर्ज फेडले आहे, जे जास्त व्याजदर आकारतात. एनएचएआय यशस्वीरीत्या त्याचे कर्ज दायित्व कमी करत आहे, असे अधिकारी पुढे म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात २०२४-२५ साठी एचएचएआयची तरतूद १.६८ लाख कोटी रुपये ठेवली होती.

logo
marathi.freepressjournal.in