आतापर्यंत ८६ हजार ३११ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात; एक लाख मेट्रिक टन निर्यातीचा अंदाज, हंगामात नेदरलँडला सर्वाधिक द्राक्ष निर्यात

नाशिक जिल्ह्यात गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलैंड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकचे द्राक्ष निर्यात झाले.
आतापर्यंत ८६ हजार ३११ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात; एक लाख मेट्रिक टन निर्यातीचा अंदाज, हंगामात नेदरलँडला सर्वाधिक द्राक्ष निर्यात
Published on

लासलगाव /हारून शेख

आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकच्या निर्यातक्षम द्राक्षांना पसंती मिळाल्यामुळे मागणी वाढल्याने यंदा द्राक्ष हंगामाचे अंतिम टप्प्यात एक लाख मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार असल्याचे संकेत आहे हंगाम सुरु झाल्या पासून आतपर्यंत ८६,३११ मे. टनद्राक्ष नाशिक जिल्ह्यातून निर्यात झाली. त्यात ५२ हजार मे. टन द्राक्ष निर्यात एकट्या नेदरलँडमध्ये झाली.

नाशिक जिल्ह्यात गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलैंड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकचे द्राक्ष निर्यात झाले. सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबई समुद्री मार्गे पोहोचले आहेत.

१ नोव्हेंबर पासून द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली असून नाशिक मधून ६३७२ कंटेनर मधून ८६ हजार ३११ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे त्यात सर्व अधिक नेदरलँड या देशात ३९११ कंटेनर म्हणून ५२ हजार४५१ मे. टन द्राक्ष निर्यात झाले आहेत.यंदाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातून १ लाख मेट्रिक टनापेक्षाहून अधिक द्राक्ष निर्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या दोन आठवड्यात निर्यातीत वाढ झाल्याने मागील वर्षी नाशिक मधून ९८ हजार ३१९ टन द्राक्ष निर्यात झाली होती यंदा त्यात वाढ होइल अशी माहिती महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली. बांगलादेशाने प्रतिकिलो द्राक्षांसाठी १०० रुपये आयातशुल्क लावल्याने द्राक्ष निर्यातीला अडसर ठरला आहे

वातावरणात होत असलेला सततचा बदल द्राक्ष बागांवर परिणाम करणारा ठरला ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादन घडले.यंदाचा हंगाम दोन आठवडे अगोदर संपेल असा अंदाज वर्तविला जात आहे. रशिया, मलेशिया , संयुक्त अरब अमिरातीसाठी मागणी वाढत आहे.

नेदरलँडला सर्वाधिक निर्यात

रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलैंड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकचे द्राक्ष निर्यात झाले. मात्र यंदादेखील सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्री प्रवासाने पोहोचले आहेत.

निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे अपेक्षा

नाशिक च्या द्राक्षांना जी आय प्रमाणपत्र मिळाले आहे मात्र त्याचा प्रचार आणि जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करायला हवे नाशिक ग्रेप्स हा ब्रँड जागतिक बाजारपेठेत लोकप्रिय करण्यासाठी मार्केटिंग फंड तयार करायला हवा.

द्राक्षाची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी शीतग्रह आणि प्रक्रिया उद्योगासाठी सरकारने शेतकऱ्यांना थेट प्रकल्प उभारणीसाठी मदत करावी.

बांगलादेश सरकारने लावलेले 100 रुपये प्रति किलो आयात शुल्क हटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक.

युक्रेनमार्गे वाहतूक थांबल्याने लांबचा मार्ग अवलंबवा लागत आहे सरकारने समुद्री आणि हवाई वाहतुकीसाठी सबसिडी द्यावी.

मालवाहू जहाजासाठी विशेष सवलत योजना राबवावी नाशिकहून मुंबई बंदरापर्यंत वाहतूक सुलभ करावी.

रशिया-युक्रेन युद्धाची धग अजूनही सुरू असून त्याचा फटका निर्यातदारांना बसत आहे. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गे लांबचा पल्ला गाठून सुरू आहे.त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे.

- कैलास भोसले, (अध्यक्ष,महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघटना)

logo
marathi.freepressjournal.in