एअर इंडियाच्या विमानातील जेवणात ब्लेड

एअर इंडियाच्या बंगळुरूहून सॅनफ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानातील प्रवाशाच्या जेवणात ब्लेड सापडल्याने एकच खळबळ उडाली.
एअर इंडियाच्या विमानातील जेवणात ब्लेड

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या बंगळुरूहून सॅनफ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानातील प्रवाशाच्या जेवणात ब्लेड सापडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, एअर इंडियाने आपली चूक मान्य करून माफी मागितली आहे. विमान कंपनीचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोगरा म्हणाले की, आमच्या एका उड्डाणावेळी प्रवाशाच्या जेवणात धातूसदृश वस्तू सापडली आहे. पण चौकशीनंतर लक्षात आले की, आमच्या कॅटरिंग पार्टनरने भाज्या कापण्यासाठी वापरलेल्या प्रोसेसिंग मशीनचे ते ब्लेड आहे. चुकून ते जेवणात पडले आणि पॅकही झाले.

आमच्या कॅटरिंग पार्टनरकडून पुन्हा अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी आम्ही चांगल्या योजना तयार करण्यासाठी काम करत आहोत. यात जेवण बनवण्याच्या प्रक्रियेची अधिकवेळा तपासणी करण्याचा समावेश करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in