अर्थव्यवस्थेत किंचित धुगधुगी; तिसऱ्या तिमाहीत विकास दर ६.२ टक्के

२०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत संथगतीने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या तिमाहीत किंचित धुगधुगी निर्माण झाली आहे.
अर्थव्यवस्थेत किंचित धुगधुगी; तिसऱ्या तिमाहीत विकास दर ६.२ टक्के
Published on

नवी दिल्ली : २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत संथगतीने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या तिमाहीत किंचित धुगधुगी निर्माण झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या काळात भारताचा विकास दर ६.२ टक्के दराने वाढला. यंदाच्या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ५.४ टक्क्यांपर्यंत घसरली होती.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सांगितले की, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वार्षिक विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. २०२३-२४ मध्ये हाच विकास दर ९.२ टक्के होता.

आरबीआयच्या अंदाजापेक्षा विकासदर कमी

तिसऱ्या तिमाहीतील विकास दराचे आकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजापेक्षा कमी आहेत. तिसऱ्या तिमाहीत विकास दर ६.८ टक्के राहील, असा आरबीआयचा अंदाज होता. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात जीडीपी ६.६ टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने केला होता. आरबीआयने डिसेंबरच्या पतधोरणात अंदाज केला की, जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकास दर ७.२ टक्के राहू शकतो. आता नवीन विकास दराच्या आकड्यांमुळे आरबीआय पुन्हा रेपो दरात कपात करू शकते. येत्या एप्रिलमध्ये पतधोरणाची बैठक आहे. या बैठकीत ०.२५ टक्के रेपो दरात कपातीची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने डिसेंबरच्या तिमाहीत रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली होती.

logo
marathi.freepressjournal.in