अंबानी यांना आता अदानींचा सहारा, नागपूरच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी ३ हजार कोटींचा व्यवहार?

कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी थोरले बंधू मुकेश अंबानी यांना आपले व्यवसाय विकणाऱ्या उद्योगपती अनिल अंबानी यांना आता मुकेश यांचे स्पर्धक गौतम अदानी यांचा आधार घ्यावा लागत आहे.
अंबानी यांना आता अदानींचा सहारा, नागपूरच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी ३ हजार कोटींचा व्यवहार?
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी थोरले बंधू मुकेश अंबानी यांना आपले व्यवसाय विकणाऱ्या उद्योगपती अनिल अंबानी यांना आता मुकेश यांचे स्पर्धक गौतम अदानी यांचा आधार घ्यावा लागत आहे. अनिल अंबानी यांच्या अखत्यारितील नागपूर येथील आष्णिक ऊर्जा प्रकल्प अदानी यांच्या अदानी पाॅवरला विकण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पाॅवरमार्फत चालविला जाणारा बुटीबोरी येथील ६०० मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प ३,००० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी अदानी पाॅवरने दर्शविल्याचे समजते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा उभय कंपन्यांमार्फत करण्यात आलेली नाही.

या व्यवहाराचे मूल्य प्रति मेगावाट ४ ते ५ कोटी रुपये असण्याचा अंदाज अर्थ विश्लेषक व्यक्त करतात. व्यवसाय व्यवहाराच्या चर्चेमुळे मात्र सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अदानी समूहातील संबंधित व्यवसायाशी निगडित कंपन्यांचे शेअरची किंमत उसळली.

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह हा सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीशी चर्चा करत आहे. या कंपनीमार्फत रिलायन्सच्या ऊर्जा कंपनीची विक्री प्रक्रिया पार पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. एकेकाळी दिवाळखोर रिलायन्स पॉवरच्या मालकीचा ऊर्जा प्रकल्प आता विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या आधीच्या उपकंपनी अंतर्गत अखत्यारित असल्याचे समजते. सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन ही वीज प्रकल्पाला कर्ज देणारी कंपनी आहे. कंपनीच्या प्रकल्पात दोन केंद्र असून आणि त्याची किंमत ६,००० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. हे प्रकल्प तूर्त बंद असून परिणामी कंपनीकरिता मूल्यांकनावर कमी होत असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in