परवडणारी किंमत अन् मायलेजही बेस्ट! 'या' ३ बाईक्सचा नाद करायचा नाही
प्रातिनिधिक फोटो

परवडणारी किंमत अन् मायलेजही बेस्ट! 'या' ३ बाईक्सचा नाद करायचा नाही

आज आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम बाईक्सबद्दल सांगणार आहोत.
Published on

आपल्या देशात बजेट सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या बाईक्सना चांगली मागणी आहे. विशेषतः मध्यमवर्गीय लोक अशा बाईक्सना प्राधान्य देतात, ज्या कमी किमतीत जास्त मायलेज देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही परवडणाऱ्या किमतीत चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

हिरो, होंडा, बजाज आणि TVS च्या बाईक्स परवडणाऱ्या बजेट सेगमेंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम बाईक्सबद्दल सांगणार आहोत.

Hero Splendor Plus: ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी एक आहे. मध्यमवर्गीय लोकांच्या गरजेनुसार या बाईकची रचना करण्यात आली आहे. तिची किंमत 76,356 रुपये ते 77,826 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

या बाईकमध्ये बसवलेले 97.2cc सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड गियर बॉक्सशी जोडलेले आहे. स्प्लेंडर तब्बल 80 kmpl पर्यंत मायलेज देते. या बाईकला 9.8 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.

Honda Shine 100: होण्डा शाईन 100 या बाईकची किंमत 66,600 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तिचे 98.98 सीसी सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन 7.38 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड गिअर बॉक्सचा पर्याय आहे.

नवीन शाइन ६८ किमी पर्यंत मायलेज देते. ही बाईक ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ गोल्ड, ब्लॅक विथ ब्लू अशा 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इलेक्ट्रिक स्टार्टर सारखी वैशिष्ट्ये या बाईकमध्ये उपलब्ध आहेत. सुरक्षितेसाठी ड्रम ब्रेकचा पर्याय आहे.

Bajaj Freedom 125 CNG: नुकतीच लाँच झालेली बजाज फ्रीडम 125 मध्यमवर्गीय लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ही बाईक CNG आणि पेट्रोल या दोन्ही इंधनांवर चालते. या बाईकची किंमत 95,000 रुपये ते 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

बजाज फ्रीडम 125 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ड्रम, ड्रम एलईडी आणि डिस्क एलईडी हे ते तीन प्रकार आहेत. या बाईकमध्ये 125 सीसी एअर कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5-स्पीड गियर बॉक्सशी जोडलेले आहे.

ही बाईक सीएनजी मोडमध्ये 130 किमी प्रति किलो मायलेज देते. तिचे पेट्रोल मायलेज 67Kmpl आहे. CNG + पेट्रोलचे मायलेज 330 किमी आहे. ही बाईक 7 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

logo
marathi.freepressjournal.in