फडणवीसांसह तीन मुख्यमंत्री, १०० सीईओ पुढील महिन्यात दावोस परिषदेत सहभागी होणार

किमान तीन मुख्यमंत्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह भारतातील १०० हून अधिक सीईओ आणि इतर नेते पुढील महिन्यात दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२५च्या २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वार्षिक बैठकीत सहभागी होतील.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : किमान तीन मुख्यमंत्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह भारतातील १०० हून अधिक सीईओ आणि इतर नेते पुढील महिन्यात दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२५च्या २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वार्षिक बैठकीत सहभागी होतील. जगभरातील सुमारे ५० राष्ट्रे आणि सरकार प्रमुख उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

लोकप्रतिनिधींच्या व्यतिरिक्त भारतीय कंपन्या - रिलायन्स, टाटा, अदानी, बिर्ला, भारती, महिंद्रा, गोदरेज, जिंदाल, बजाज आणि वेदांत समूह यांसारख्या व्यावसायिक समूहांचे उच्च अधिकारी उपस्थित असतील. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या व्यतिरिक्त, त्यांच्या गटातील पुढच्या पिढीचे नेते देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, तर इन्फोसिसचे सलील पारेख, विप्रोचे ऋषद प्रेमजी, तसेच रिन्यूचे सुमंत सिन्हा, पेटीएम आणि अदारचे विजय शेखर शर्मा यांच्यासह तंत्रज्ञान नेते सीरम इन्स्टिट्यूटचे पूनावाला हे हजर राहणे अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in