गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

Ampere Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची उत्तम संधी! Ampere आपल्या स्कूटरवर 10,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, जाणून घ्या तपशील
गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

मुंबई: अलीकडच्या काळात देशात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च करत आहेत. भारतात ओला इलेक्ट्रिकशी (Ola Electric) स्पर्धा करणारी अँपिअर इलेक्ट्रिक (Ampere Electric) कंपनी आपल्या स्कूटरवर बंपर ऑफर देत आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत 10,000 रुपयांपर्यंत कपात केली आहे.

कंपनीने आपल्या लाइनअपच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सची किंमत कमी केली आहे. यामध्ये Reo Li Plus आणि Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. ही दोन्ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स आहेत. सध्या, अँपिअर ब्रँड अंतर्गत 6 इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल विकले जातात, यामध्ये Primus, Zeal EX, Reo Li Plus, Magnus, Magnus Special आणि Nexus यांचा समावेश आहे. अशा स्थितीत कंपनीने विक्री वाढवण्यासाठी दोन मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत.

किंमत किती कमी केली?:

अँपिअरने रिओ एलआय प्लस आणि मॅग्नस या दोन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेलच्या किमती कमी केल्या आहेत. आता तुम्ही Rio LI Plus 69,900 रुपयांऐवजी फक्त 59,900 रुपयांना खरेदी करू शकता.

मॅग्नस दोन प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे, Magnus EX आणि Magnus LT यांचा समावेश आहे. आता तुम्ही 104,900 रुपयांऐवजी केवळ 94,900 रुपयांमध्ये Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

याशिवाय, तुम्ही आता फक्त 84,900 रुपयांमध्ये Magnus LT इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.

मॅग्नस इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये:

मॅग्नस इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 80 किमी ते 100 किमी प्रवास करू शकते. पूर्ण चार्ज होण्यासाठी तिला 6 ते 7 तास लागतात. मॅग्नसचा टॉप स्पीड 45 किमी प्रति तास आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टेबल बॅटरी पॅक, विविध राइड मोड, मोठी सीट आणि प्रीमियम मेटॅलिक रंगांमध्ये सादर केली आहे.

Reo Li Plus इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये: Reo Li Plus ही स्लो मूव्हिंग इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल आहे. तिचं टॉप स्पीड फक्त 25 किलोमीटर प्रति तास आहे. ही स्कूटर 120 किलो पर्यंत वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्णपणे चार्ज केल्यावर 70 किमी पर्यंत प्रवास करू शकतो. तिला पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात.

logo
marathi.freepressjournal.in