कर्मचाऱ्यांसाठी कार्यस्थळी मिळणारी प्रशंसा महत्त्वपूर्ण; एका अहवालाचा निष्कर्ष

कामाच्या ठिकाणी मिळणारी प्रशंसा आणि समाविष्ट असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वास व आनंदावर थेट परिणाम करते, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. इंडिड इंडिया या जॉब साइटने भारतातील विविधता आणि समावेश यावर आधारित ‘ब्रीजिंग द गॅप’ या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.
कर्मचाऱ्यांसाठी कार्यस्थळी मिळणारी प्रशंसा महत्त्वपूर्ण; एका अहवालाचा निष्कर्ष
Published on

बंगळुरू : कामाच्या ठिकाणी मिळणारी प्रशंसा आणि समाविष्ट असल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वास व आनंदावर थेट परिणाम करते, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. इंडिड इंडिया या जॉब साइटने भारतातील विविधता आणि समावेश यावर आधारित ‘ब्रीजिंग द गॅप’ या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.

या सर्वेक्षणानुसार, कार्यस्थळांवर सकारात्मक संस्कृती निर्माण करण्यासाठी वरिष्ठांकडून मिळणारी ओळख आणि कौतुक महत्त्वाचे ठरते. ६३ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कंपनीच्या नेतृत्वाकडून मिळणाऱ्या कौतुकामुळे त्यांना कामात अधिक प्रोत्साहन मिळते. वैयक्तिक योगदानाची दखल घेतली जाते तेव्हा कर्मचारी अधिक प्रेरित होतात, हेही यात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, ६२ टक्के कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रशंसेमुळे कामाचा आनंद वाढतो, असे मत नोंदवले. ५८ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या कल्पना आणि मतांचा स्वीकार झाला, तर त्यांना कार्यस्थळी अधिक आपुलकी वाटते. सर्जनशीलता आणि मोकळेपणाचे वातावरण तणाव कमी करून समाधान वाढवते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६४ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देणारे वातावरण त्यांना कामाशी अधिक जोडते.

इंडिड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले की, प्रशंसा आणि सुरक्षित वातावरण ही कार्यसंस्कृतीच्या यशाची दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. ज्या कंपन्या समावेशनाला प्राधान्य देतात त्या केवळ कर्मचारी टिकवण्यात यशस्वी ठरतात असे नाही, तर त्या व्यवसायाच्या यशाचाही मजबूत पाया घालतात.

logo
marathi.freepressjournal.in