बजाज फिनसर्व्ह डॉक्टर लोन : मिळवा 96 महिन्यांपर्यंतच्या सोयीच्या परतफेड कालावधीसह 80 लाखांपर्यंतच्या लोनची लगेच मंजुरी

बजाज फिनसर्व्ह डॉक्टर लोनच्या माध्यमातून मिळवा 96 महिन्यांपर्यंतच्या सोयीच्या परतफेड कालावधीसह रु. 80 लाखांपर्यंतच्या लोनची लगेच मंजुरी.
बजाज फिनसर्व्ह डॉक्टर लोन : मिळवा 96 महिन्यांपर्यंतच्या सोयीच्या परतफेड कालावधीसह 80 लाखांपर्यंतच्या लोनची लगेच मंजुरी

डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा तज्ज्ञांसह वैद्यकीय व्यावसायिक सार्वजनिक आरोग्य आणि कल्याण यांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आरोग्यसेवेतील त्यांचे कौशल्य असूनही, त्यांना अनेकदा अद्वितीय आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करण्यापासून ते प्रगत वैद्यकीय उपकरणे आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत, वैद्यकीय व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा लक्षणीय असू शकतात.

अशा परिस्थितींमध्ये, अनुकूल डॉक्टर लोन इंटरेस्ट रेट्सने लोन सुरक्षित केल्याने तुमच्या आर्थिक प्रवासात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो. विशेषत: वैद्यकीय व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले डॉक्टर्स लोन, या अनन्य गरजा पूर्ण करण्यासाठी सानुकूल वित्तपुरवठा उपाय देऊ करतात आणि पारंपरिक कर्जाच्या तुलनेत स्पर्धात्मक व्याजदर, लवचिक परतफेड आणि सहज पूर्तता करता येतील अशा अटी आणि पात्रता मापदंड देऊ करतात.

मात्र, डॉक्टरांसाठीच्या कर्जावर (Professional loan for doctor) अनुकूल अटी आणि व्याजदर मिळणे हे तुमच्या पतपात्रतेवर अवलंबून असते. तुमचा क्रेडिट स्कोअर तुमची क्रेडिट योग्यता आणि जबाबदारीने कर्ज व्यवस्थापित करण्याची तुमची क्षमता प्रतिबिंबित करतो.

सर्वोत्तम डॉक्टर लोन व्याजदर मिळवणयसाठी तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा कशी करता येईल ते इथे पहा.

1. तुमचा क्रेडिट स्कोअर समजून घ्या: तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यापूर्वी, क्रेडिट स्कोअर महणजे काय आणि त्याची गणना कशी केली जाते हे तुम्ही समजून घ्यायला हवे. भारतात, सामान्यपणे क्रेडिट स्कोअरची श्रेणी 300 ते 900 असते, जास्त स्कोअर कमी पर जोखीम सूचित करते. तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये तुमचा पेमेंट इतिहास, क्रेडिट वापर, क्रेडिट इतिहासाचा दीर्घ अवधी , क्रेडिट खात्यांचे प्रकार आणि अलीकडील क्रेडिट चौकशी यांचा समावेश असतो.

2. तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासा: तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमची क्रेडिट खाती, पेमेंट इतिहास, तुमचा क्रेडिट इतिहास आणि थकीत कर्जे यासह तुमच्या क्रेडिट इतिहासाची तपशीलवार माहिती असते. सगळी माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची सुनिश्चिती करण्यासाठी तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे नियमितपणे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. तुम्हाला काही त्रुटी किंवा विसंगती दिसल्यास, जसे उशीरा देयके दिल्याची चुकीची माहिती किंवा फसवी खाती, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही क्रेडिट ब्युरोशी व्यवहार केला पाहिजे.

3. तुमची बिलं वेळेवर भरा: पेमेंट इतिहास हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर प्रभाव टाकणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. एक चांगला क्रेडिट इतिहास राखण्यासाठी प्रत्येक वेळी तुमची बिलं वेळेवर भरणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुमचे क्रेडिट बिल, लोन ईएमआय किंवा अत्यावश्यक सेवांची बिलं असो, उशीरा देय भरण्याचा दंड आणि तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर नकारात्मक गुण टाळण्यासाठी देय तारखेच्या आत पैसे भरण्याची सुनिश्चिती करा.

4. तुमचे क्रेडिट वापर गुणोत्तर कमी करा: तुम्हाला उपलब्ध एकूण उपलब्ध क्रेडिटच्या तुलनेत तुम्ही वापर करत असलेली क्रेडिट रक्कम म्हणजे तुमचे क्रेडिट वापर गुणोत्तर. क्रेडिट वापर गुणोत्तर जास्त असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या कर्जापेक्षा जास्त वापर केला आहे किंवा कर्ज व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही झगडत आहात असा होऊन तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी तुमचे क्रेडिट वापर गुणोत्तर 30% ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवा. विद्यमान कर्जाची परतफेड करुन आणि तुमच्या क्रेडिट कार्ड्सचा कमाल वापर करण्याचे टाळून तुम्ही हे साध्य करू शकता.

5. खूप जास्त नवीन क्रेडिट कार्ड खाती उघडण्याचे टाळा: नवीन क्रेडिट खात्यासाठी अर्ज करताना, मग ते क्रेडिट कार्ड असो, लोन किंवा लाइन ऑफ क्रेडिट असो, कर्जदाते प्रत्येकवेळी तुमच्या क्रेडिट रिपोर्टची कसून चौकशी करतील. अल्पावधीत अनेकवेळा कसून चौकशी झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो आणि तुम्ही उच्च जोखीम असलेले कर्जदार आहात असे संकेत कर्जदात्यांना मिळतात. हे टाळण्यासाठी, नवीन क्रेडिट खात्यांसाठी अतिशय विचारपूर्वक अर्ज करा आणि जेव्हा तुम्हाला त्याची आवश्यकता असेल तेव्हाच क्रेडिटसाठी अर्ज करा.

6. वैविध्यपूर्ण क्रेडिट पोर्टफोलियो तयार करा: क्रेडिट कार्ड्स, लोन्स आणि गहाण असे विविध प्रकारची क्रेडिट खाती असल्यास त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक प्रभाव पडतो. तुम्ही जबाबदारीने विविध प्रकारचे क्रेडिट व्यवस्थापित करत आहात ही कर्जदात्यांसाठी समाधानाची बाब असते. तुमचा क्रेडिट पोर्टफोलियो वैविध्यपूर्ण नसेल तर तुमच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये विविधता आणण्यासाठी तुम्ही नवीन क्रेडिट खाते उघडण्याचा किंवा लाहन रकमेच्या कर्जासाठी अर्ज करण्याचा विचार करू शकता.

बजाज फिनसर्व्ह डॉक्टर लोनचा विचार का करावा?

बजाज फिनसर्व्ह डॉक्टर लोन वैद्यकीय व्यावसायिकांच्या अद्वितीय गरजांसाठी सानुकूल केलेला रु. 80 लाखांपर्यंत विशेष वित्तपुरवठा करू शकते. फक्त 11% प्रती वर्षापासून सुरु होणारे स्पर्धात्मक व्याजदर, 96 महिन्यांपर्यंतचे सोयीचा परतफेड कालावधी आणि सोपी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया यासह ते विश्वासार्ह आर्थिक मदत देऊ करते. तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा करुन तुम्ही तुमच्या व्यावसायिक ध्येयासाठी प्रॅक्टिसचा विस्तार करण्यासाठी निधी वापरू शकता. तुमची पतपात्रता वाढवण्यासाठी पाऊले उचला आणि तुम्हाला आवश्यक वित्तपुरवठा प्राप्त करा. आजच बजाज फिनसर्व्ह अ‍ॅप डाऊनलोड करा.

logo
marathi.freepressjournal.in