हॉट उन्हाळ्यातही कूल प्रवास! Ventilated Seats असणाऱ्या भारतातील सर्वोत्तम 5 कार

Best 5 Cars with ventilated seats in India : सध्या देशात अनेक परवडणाऱ्या कार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला व्हेंटीलेटेड सीट्सचं फीचर उपलब्ध आहे.
व्हेंटिलेटेड सीट्स
व्हेंटिलेटेड सीट्समारुती सुझुकी

मुंबई : उन्हाळ्यात आपल्या कारची सीट गरम होते. अशावेळी वाहन चालवणं कठीण होऊ शकतं...पण काळजी करू नका, सध्या देशात अनेक परवडणाऱ्या कार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला व्हेंटीलेटेड सीट्सचं फीचर उपलब्ध आहे. या सीट्समुळं ड्रायव्हिंग आणखी मजेदार होतं. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 कार ज्यात व्हेंटीलेटेड सीट्स आहेत आणि त्यांची किंमतही जास्त नाही.

1. Tata Nexon: 11.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरुवातीच्या किंमतीसह, व्हेंटीलेटेड सीट्स ऑफर करणारी Tata Nexon ही या यादीतील सर्वात परवडणारी कार आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे.

2. Kia Sonet: सॉनेट तिच्या HTX 1.0L T-GDi 7DCT व्हेरियंटमध्ये फ्रंट-व्हेंटिलेटेड सीट देते. हे फीचर ड्रायव्हर आणि समोरच्या प्रवाशासाठी उपयुक्त आहे. 12.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीसह, व्हेंटीलेटेड सीट्स देणारी सोनेट ही या यादीतील दुसरी कार आहे.

ही कॉम्पॅक्ट SUV HTX+ ट्रिममध्ये दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहेत, 1.0L टर्बो-पेट्रोल आणि 1.5L टर्बो-डिझेल... या कारमध्ये ट्रान्समिशनचे अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. कमी बजेटमध्ये लक्झरी शोधणाऱ्यांसाठी ही कार उत्तम पर्याय आहे.

3. मारुती सुझुकी XL6: 12.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीसह, नवीन मारुती सुझुकी XL6 देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे.

या कारच्या अल्फा+ ट्रिमला व्हेंटीलेटेड फ्रंट सीट्स मिळतात. या आसनांमुळे लांबचा प्रवास छान होतो. या मॉडेलमध्ये नवीन 6-स्पीड AT गिअरबॉक्स देखील आहे आणि मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय देखील उपलब्ध आहे.

4. Hyundai Verna: सुमारे 14.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीसह, Hyundai Verna ही या यादीतील सर्वोत्तम कार आहे. जर तुम्हाला आरामदायी प्रवास करायला आवडत असेल तर Hyundai Verna हा एक चांगला पर्याय आहे!

तिच्या 1.5 लीटर MPi पेट्रोल 6MT SX(O) व्हेरियंटला फ्रंट व्हेंटीलेटेड सीट्स मिळतात, या सीट्स ड्रायव्हिंगला आरामदायी बनवतात आणि कार स्टायलिश देखील दिसते.

5. फोक्सवॅगन वर्टस (Volkswagen Virtus) : फोक्सवॅगन वर्टसच्या 1.0 लिटर TSI MT टॉपलाइन व्हेरियंटला व्हेंटिलेटेड सीट्स मिळतात. या खास सीट कारला अधिक आरामदायी बनवतात आणि तुम्हाला लक्झरी कार चालवण्याची अनुभूती देतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 15.27 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

logo
marathi.freepressjournal.in