काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

आज आम्ही तुम्हाला 6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या काही सर्वोत्तम कारची माहिती देणार आहोत.
मारूती सुझुकी
मारूती सुझुकी मारुती सुझुकी

मुंबई : भारतात मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय लोक राहतात. यापैकी बहुतेकांना आपल्या कुटुंबासाठी आपल्या बजेटमध्ये बसेल अशी नवीन कार खरेदी करायची असते. चला आज आपण कमी किंमतीत मिळणाऱ्या सर्वोत्तम कारची यादी पाहणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला 6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या काही सर्वोत्तम कारची माहिती देणार आहोत. यामध्ये हॅचबॅक आणि एसयूव्ही दोन्हीचा समावेश आहे.

Maruti Suzuki Alto K10: सर्वात आधी मारुती सुझुकी अल्टो K10 हॅचबॅकबद्दल बोलूया, तुम्ही ही कार 3.99 लाख ते 5.96 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत खरेदी करू शकता. या कारमध्ये 1-लिटर पेट्रोल आणि CNG इंजिन आहे.

या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 24.39 ते 24.90 किमी प्रति लीटर मायलेज देते आणि CNG मॉडेल 33.85 किमी प्रति लिटर मायलेज देते. नवीन Alto K10 मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto, Apple कार प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आहेत.

Renault KWID: रेनो क्विडची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख ते 6.45 लाख रुपये आहे. या हॅचबॅकमध्ये 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 68 PS कमाल पॉवर आणि 91 Nm पीक टॉर्क निर्माण करते.

5-स्पीड मॅन्युअल/5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह ही कार उपलब्ध असून ती 21.46 ते 22.3 किमी प्रति लिटर चे मायलेज देते. रेनो क्विडमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, कीलेस एंट्री, मॅन्युअल एसी यांसह अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत.

TATA Tiago: या हॅचबॅकची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख ते 8.90 लाख रुपये आहे. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल/ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह 1.2-लिटर पेट्रोल आणि CNG इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.

या कारचं पेट्रोल व्हेरिएंट 19.43 ते 20.01 kmpl मायलेज देते, तर CNG मॉडेल 26.49 - 28.06 kmpl मायलेज देते. कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 8-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोलसह अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

Nissan Magnite: या यादीत एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही निस्सान मॅग्नानाईट देखील समाविष्ट आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 6 लाख ते 11.27 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड ऑटोमॅटिक/CVT गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

ही कार 17.4 ते 20 किमी प्रति लिटर मायलेज देते. निस्सान मॅग्नाइटमध्ये FWD (फ्रंट व्हील ड्राइव्ह) तंत्रज्ञान आहे, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो अॅपल कारप्ले यांसह इतरही काही फीचर्स उपलब्ध आहेत.

logo
marathi.freepressjournal.in