
भारतातील खराब हवेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकी अब्जाधीश ब्रायन जॉन्सन जे स्वतःचे वय कमी केल्याच्या दाव्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीझोतात आले आहेत. त्यांनी नुकताच 'झिरोदा'चे सह संस्थापक निखिल कामत यांचा पॉडकास्ट फक्त १० मिनिटांतच सोडला. खराब हवेचे कारण देत त्यांनी हा शो मध्येच सोडला. त्यानंतर आपल्या एक्स पोस्टवर भारतातील खराब हवा आणि हवेतील AQI बद्दल पोस्ट करून टीका केली. जॉन्सन यांच्या या पोस्टमुळे भारतातील खराब हवेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अमेरिकी अब्जाधीश ब्रायन जॉन्सन हे स्वतःचे वय कमी करण्यासाठी आणि सदैव तरुण राहण्यासाठी सातत्याने प्रयोग करणे आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. रिपोर्टनुसार, ते दरवर्षी यासाठी १६ कोटी रुपये खर्च करतात. जॉन्सन हे नुकतेच भारतात येऊन गेले. त्यांनी निखिल कामत यांच्या पॉडकॉस्टमध्ये सहभाग घेतला. निखिल कामत हे 'झिरोदा'चे सह संस्थापक आहेत. मात्र, ते त्यांच्या पॉडकॉस्टसाठी प्रसिद्ध आहेत. जॉन्सन भारतात तीन दिवस राहिले. शोमध्ये त्यांना कामत यांनी विचारले तू पहिल्यांदाच भारतात आला आहे तुला कसे वाटत आहे? यावेळी त्यांनी येथील खराब हवेबाबत उल्लेख केला. तसेच हा शो त्यांनी १० मिनिटातच सोडून दिला. मुंबईतील वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पॉडकॉस्ट रेकॉर्ड करण्यात येत होता. त्यावेळी तेथील हवेचा AQI जवळपास १३० होता. याशिवाय जॉन्सन याने मास्क घातला होता. शो सोडून गेल्यानंतर त्यांनी एक्स वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आणि भारतातील हवेच्या प्रदुषणाबाबत येथील सरकार, नागरिक किती उदासीन आहे. येथील लोकांना हा प्रश्न गंभीर वाटत नाही, अशी चर्चा केली.
जॉन्सन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निखिल कामत यांचा पॉडकास्ट मी लवकर संपवला कारण जिथे हा शो रेकॉर्ड होत होता. तिथे बाहेरची हवा खोलीत फिरत होती. त्यामुळे मी माझ्यासोबत आणलेले एअर प्युरीफायर कुचकामी ठरले. आत, AQI १३० होता आणि PM२.५ ७५ µg/m³ होते. हे २४ तासांच्या संपर्कात राहून ३.४ सिगारेट ओढण्याच्या बरोबरीचे आहे. भारतात हा माझा तिसरा दिवस होता आणि वायू प्रदूषणामुळे माझी त्वचा पुरळ उठली होती आणि माझे डोळे आणि घसा जळत होते. भारतात वायू प्रदूषण खूप सामान्य आहे, असेही म्हटले.
दरम्यान, या प्रकरणामुळे भारतातील खराब हवेचा प्रश्न, हवेतील AQI आणि PM चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.