शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफ धमक्यांचे भारतात पडसाद; सेन्सेक्स, निफ्टीत २ टक्क्यांची आपटी

चिनी उत्पादनांवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लादण्याच्या अमेरिकी अध्यक्ष डोनल्ड ट्र्म्प यांच्या ताज्या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत झालेल्या मोठ्या घसरणीचे प्रतिबिंब शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये २ टक्क्यांनी घसरण झाली.
शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफ धमक्यांचे भारतात पडसाद; सेन्सेक्स, निफ्टीत २ टक्क्यांची आपटी
Published on

मुंबई : चिनी उत्पादनांवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लादण्याच्या अमेरिकी अध्यक्ष डोनल्ड ट्र्म्प यांच्या ताज्या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत झालेल्या मोठ्या घसरणीचे प्रतिबिंब शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये २ टक्क्यांनी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजारातील महिन्यातील शेवटच्या तसेच आठवड्याच्या शेवटच्या सत्रात खळबळ उडाली.

बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स १,४१४.३३ अंकांनी घसरून ७३,१९८.१० वर स्थिरावला. दिवसभरात तो १,४७१.१६ अंकांनी घसरून ७३,१४१.२७ पऱ्यंत खाली आला होता. तर एनएसई निफ्टी ४२०.३५ अंकांनी घसरून २२,१२४.७० वर बंद झाला. सलग आठव्या दिवशीही घसरण विस्तारताना टक्केवारीत दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे १.९० टक्के व १.८६ टक्क्यांनी खाली आले. गेल्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी ८५,९७८.२५ या विक्रमी उच्चांकावरून बीएसई बेंचमार्क निर्देशांक १२,७८०.१५ अंकांनी किंवा १४.८६ टक्क्यांनी घसरला आहे. २७ सप्टेंबर २०२४ रोजी २६,२७७.३५ या त्याच्या आयुष्यातील उच्चांकावरून निफ्टी ४,१५२.६५ अंकांनी किंवा १५.८० टक्क्यांनी घसरला आहे.

सतत परदेशी निधी बाहेर पडणे आणि अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दलच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी शेअरच्या विक्रीचा मारा वाढविला. टेक महिंद्राचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले. इंडसइंड बँक ५ टक्क्यांहून अधिक घसरले. तर महिंद्र अँड महिंद्र, भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा मोटर्स, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नेस्ले, मारुती हे प्रमुख घसरणीचे घटक होते.

डॉलरच्या तुलनेत रुपया २८ पैशांनी घसरला

शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २८ पैशांनी घसरून ८७.४६ वर बंद झाला, कारण अमेरिकन चलनाची ताकद आणि देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मक ट्रेंडमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला.

अमेरिकेने कर लादण्याभोवती सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे वित्तीय बाजारांमध्ये चढ-उतार आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

रोकड तरलतेकरिता रिझर्व्ह बँकेची डाॅलर खरेदी

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रणालीमध्ये दीर्घकालीन तरलता आणण्यासाठी १० अब्ज डाॅलर किमतीचे अमेरिकन डॉलर-रुपया स्वॅप केले. यायामुळे लिलावात मोठी मागणी निर्माण झाली. लिलावाचे निराकरण ४ आणि ६ मार्च रोजी होईल.

३ वर्षांच्या कालावधीसाठी डाॅलर-रुपया खरेदी/विक्री स्वॅप लिलावात १.६२ वेळा अधिक सबस्क्राइब केले गेले.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, लिलावादरम्यान त्यांना २४४ बोली मिळाल्या आणि त्यापैकी १६१ बोली एकूण १०.०६ अब्ज डाॅलर किमतीच्या स्वीकारण्यात आल्या. जागतिक अनिश्चिततेमध्ये डाॅलरच्या तुलनेत रुपया ८७.४६ वर व्यापार करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा लिलाव करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून हा स्वॅप साध्या खरेदी/विक्री परकीय चलन स्वॅपच्या स्वरूपात होता. बँक रिझर्व्ह बँकेला अमेरिकन

डॉलर्स विकेल आणि स्वॅप कालावधीच्या शेवटी त्याच प्रमाणात अमेरिकन डॉलर्स खरेदी करण्यास सहमत होईल.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया ८७.३२ वर उघडला. सत्रादरम्यान तो ८७.५३ च्या इंट्रा-डे नीचांकी पातळीवर घसरला आणि नंतर सत्र संपला तो डॉलरच्या तुलनेत ८७.४६ (तात्पुरता) वर, मागील बंदपेक्षा २८ पैशांनी घसरला. गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १ पैशाच्या किरकोळ वाढीसह ८७.१८ वर जवळजवळ स्थिरावला. प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर्सची वाढ आणि एफआयआयचा सततचा बहिर्गमन यामुळेही देशांतर्गत चलनातील घसरणीला हातभार लागला, असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर कमकुवत संकेतांमुळे वाढलेल्या मंदीच्या भावनेमुळे राष्ट्रीय बाजारात मोठी घसरण झाली. पुढील आठवड्यात लागू होणाऱ्या कॅनडा आणि मेक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या तेलावर २५ टक्के कर लागू होण्याची भीती आणि चिनी वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त कर लागू होण्याची भीती यामुळे ही घसरण झाली. बाजारातील गोंधळात भर घालत युरोपियन युनियनवर संभाव्य कर लादल्याने अनिश्चितता आणखी वाढली आहे.

- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

logo
marathi.freepressjournal.in