ब्लू स्टार विस्तारासाठी ४०० कोटी खर्च करणार

देशातील वातानुकूलित यंत्र क्षेत्रातील मोठी कंपनी ब्लू स्टार लिमिटेड २०२६ या आर्थिक वर्षात ४०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
ब्लू स्टार विस्तारासाठी ४०० कोटी खर्च करणार
Published on

कोलकात्ता : देशातील वातानुकूलित यंत्र क्षेत्रातील मोठी कंपनी ब्लू स्टार लिमिटेड २०२६ या आर्थिक वर्षात ४०० कोटी रुपये खर्च करणार आहे. एसी, कमर्शियल रेफ्रिजरेटर व व्यावसायिक एसी आदी क्षेत्रात कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवणार आहे.

श्री सिटी येथील कारखान्याची क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने २०० कोटींची तरतूद केली आहे. यामुळे एसी उत्पादनाची क्षमता वार्षिक ८.५ लाखांवरून १२ लाख युनिटवर जाणार आहे. मुंबईजवळच्या कारखान्यात कमर्शियल फ्रीजर्ससाठी ५३ कोटी रुपये तर हिमाचल प्रदेशातील कमर्शियल एसीसाठी १५० कोटी रुपयांचा कारखाना उघडला जाईल. आम्ही या आर्थिक वर्षात २० टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. यंदा घरगुती एसीचा व्यवसाय ३० टक्के वाढण्याची शक्यता आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी सांगितले.

गेल्यावर्षी उष्णता वाढल्याने घरगुती एसीच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. यंदा कंपनीने बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात नावीन्यपूर्णता, तात्काळ डिलव्हरी आदींचा समावेश असेल.

व्यावसायिक रेफ्रिजरेटर क्षेत्रात कंपनीने आपला बाजारपेठेतील हिस्सा ३० वरून ३३ टक्के करण्याचे ठरवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in