रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी; दशकातील सर्वोच्च पातळीवर निर्देशांक

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी असून गेल्या तिमाहीतील ६९ च्या तुलनेत...
(प्रतिकात्मक छायाचित्र)
(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई : भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी असून गेल्या तिमाहीतील ६९ च्या तुलनेत 'द नाइट फ्रँक-नारेडको रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स' (NAREDCO-Knight Frank Report) पहिली तिमाही २०२४ (जानेवारी-मार्च) कॅलेंडर वर्षात निर्देशांक ७२ वर गेला. या रिपोर्टनुसार, रिअल इस्टेट क्षेत्रातील निर्देशांक या दशकातील उच्चांक पातळीवर पोहोचला.

अहवालानुसार, फ्यूचर सेंटिमेंट स्कोअर (भविष्यातील भावना निर्देशांक) मध्ये वाढ झाली असून २०२३ च्या चौथ्या तिमाहीमधील ७० वरून २०२४ मध्ये पहिल्या तिमाहीत ७३ वर पोहोचला आहे. ५० चा स्कोअर तटस्थता दर्शवतो, ५० पेक्षा जास्त निर्देशांक सकारात्मक भावना दर्शवतो आणि ५० पेक्षा कमी नकारात्मक भावना दर्शवतो.

या त्रैमासिक सर्वेक्षणानुसार, ७३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी पुढील सहा महिन्यांत निवासी विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा केली असून मागील तिमाहीत हा आकडा ६५ टक्के होता. गृहखरेदी करणाऱ्यांची सकारात्मक भावना आणि गृहकर्जाच्या व्याजदरातील स्थिरता यामुळे पुढील सहा महिन्यांत निवासी क्षेत्रात मागणी वाढेल, अशी अपेक्षा भागधारकांना वाटू लागली आहे.

२०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील सर्वेक्षण सहभागींपैकी ८० टक्के लोकांना विश्वास आहे की, नवे निवासी गृहप्रकल्प लॉंच करण्याचे प्रमाण पुढील सहा महिन्यांत वाढेल. तर २०२४ च्या पहिल्या तिमाहीमधील सर्वेक्षणातील ८२ टक्के प्रतिसादकर्त्यांना पुढील सहा महिन्यांत घरांच्या किमती वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापि, २०२३ च्या चौथ्या तिामहीत ६५ टक्के सर्वेक्षण उत्तरदात्यांचे असेच मत होते.

२०२४ च्या पहिल्या तिमाहीत ७४ टक्के सर्वेक्षण उत्तरदात्यांनी पुढील सहा महिन्यांत कार्यालय भाड्याने देण्याच्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर २०२३ च्या सर्वेक्षणातील ६९ टक्के उत्तरदात्यांचे मागील तिमाहीत असेच मत होते.

५८ टक्के सर्वेक्षण उत्तरदाते पुढील सहा महिन्यांत कार्यालयीन पुरवठा सुधारण्याची अपेक्षा करतात. मागील तिमाहीत, ६२ टक्के उत्तरदात्यांचे असेच मत होते. कार्यालय भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण वाढण्यासह नवीन पुरवठ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील नजीकच्या काळात मजबूत झाला आहे.

२०२४ च्या पहिल्या तिमाहीमध्ये सर्वेक्षणातील ६५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी कार्यालयाचे भाडे वाढण्याची अपेक्षा केली आहे. २०२३ च्या चौथ्या तिमाहीमधील ५३ टक्के सर्वेक्षण प्रतिसादकर्त्यांनी वरील प्रकारे मत व्यक्त केले.

शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया, म्हणाले, भारताच्या मजबूत आर्थिकवाढीमुळे रिअल इस्टेट निर्देशांक स्कोअरमध्ये लक्षणीय वाढ होऊन रिअल इस्टेट क्षेत्र आशावादी बनले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील उद्योगपतींचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेतून भरभराटीची अपेक्षा आहे.

नारेडकोचे अध्यक्ष हरी बाबू म्हणाले की, २०२४ च्या पहिल्या तिमाहीसाठी नाइट फ्रँक नारेडको रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक उत्साही दृष्टिकोन दर्शवितो. वर्तमान भावना निर्देशांक ६९ वरून ७२वर आणि भविष्यातील सेंटिमेंट स्कोअर ७० वरून ७३ पर्यंत आहे. सरकारच्या आक्रमक आर्थिक वाढीच्या वचनबद्धतेमुळे उद्योगपतींचा आत्मविश्वास वाढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in