अर्थसंकल्पामुळे बीएसई, एनएसईमध्ये १ फेब्रुवारीला व्यवहार

पुढील वर्षी १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामुळे शेअर बाजारात व्यवहार सुरू राहण्याची घोषणा केली.
अर्थसंकल्पामुळे बीएसई, एनएसईमध्ये १ फेब्रुवारीला व्यवहार
Published on

मुंबई : पुढील वर्षी १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामुळे शेअर बाजारात व्यवहार सुरू राहण्याची घोषणा केली. सहसा, बीएसई व एनएसईमध्ये शनिवारी व्यवहार बंद असतात. दोन्ही एक्स्चेंजच्या अधिसूचनेनुसार, १ फेब्रुवारी रोजी बाजार उघडण्याची वेळ ९ वाजता असेल आणि बंद होण्याची वेळ ५ वाजता असेल.

यापूर्वीही अर्थसंकल्पाच्या दिवशी सुट्टी आली असेल तर त्या दिवशी शेअर बाजारात व्यवहार झाले आहेत. यापूर्वी, शनिवार, १ फेब्रुवारी, २०२० आणि शनिवार, २८ फेब्रुवारी २०१५) रोजी शेअर बाजारात व्यवहार झाले होते. अर्थसंकल्प सादर करताना झालेल्या महत्त्वाच्या घोषणांवर त्वरित प्रतिक्रिया देण्याची संधी गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना देता येते, असे एक्स्चेंजेसचे मत आहे.

logo
marathi.freepressjournal.in