मुंबईतील मालमत्तांची नोंदणी ८ टक्क्यांनी वाढली; जानेवारी ते एप्रिल कालावधीत ५२,८९६ युनिट्स, अ‍ॅनारॉकच्या अहवालातील माहिती

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांची नोंदणी जानेवारी ते एप्रिल या काळात ८ टक्क्यांनी वाढून ५२,८९६ युनिट्सवर पोहोचली, असे ॲनारॉकने म्हटले आहे.
मुंबईतील मालमत्तांची नोंदणी ८ टक्क्यांनी वाढली; जानेवारी ते एप्रिल कालावधीत ५२,८९६ युनिट्स, अ‍ॅनारॉकच्या अहवालातील माहिती
Published on

नवी दिल्ली : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांची नोंदणी जानेवारी ते एप्रिल या काळात ८ टक्क्यांनी वाढून ५२,८९६ युनिट्सवर पोहोचली, असे ॲनारॉकने म्हटले आहे. भू-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक मंदी असूनही २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत मुंबईतील मालमत्ता नोंदणीने नवीन उच्चांक गाठला आहे, असे रिअल इस्टेट सल्लागार ॲॅनारॉक यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील नोंदणी महानिरीक्षकांच्या (आयजीआर) आकडेवारीच्या विश्लेषणातून असे दिसून आले की, २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत मुंबईतील मालमत्ता नोंदणींमधून एकूण महसूल सुमारे ४,६३३ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील ३,८३६ कोटी रुपयांपेक्षा २१ टक्क्यांनी जास्त आहे. नोंदणी संख्येच्या बाबतीत, २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत मुंबईत ५२,८९६ मालमत्ता नोंदणीकृत झाल्या, गेल्या वर्षी याच कालावधीत ४८,८१९ होत्या. ही आकडेवारी प्राथमिक आणि दुय्यम बाजार व्यवहारांशी संबंधित आहे.

ॲॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत मालमत्ता नोंदणींमध्ये वाढ होण्यामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मार्चमधील विक्रमी- १५,५०१ मालमत्ता नोंदणीकृत झाल्या. या वर्षी एप्रिलमध्ये, ॲनारॉकने सांगितले, की गेल्या वर्षी याच महिन्यात ११,६४८ युनिट्सच्या तुलनेत १३,०८० युनिट्सची नोंदणी झाली. या आकडेवारीवर भाष्य करताना, स्टार्टअप रेलॉयचे संस्थापक आणि सीईओ अखिल सराफ म्हणाले की, भारताच्या आर्थिक राजधानीत घरांची मागणी विशेषतः लक्झरी घरांसाठी मजबूत आहे.

logo
marathi.freepressjournal.in