२०३० पर्यंत भारतीय ईव्ही मार्केट वार्षिक १ कोटी युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठेल; रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना अपेक्षा

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०३० पर्यंत वार्षिक एक कोटी युनिटपर्यंत विक्रीचा टप्पा गाठेल आणि ५ कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी मंगळवारी सांगितले.
नितीन गडकरी
नितीन गडकरीसंग्रहित फोटो
Published on

नवी दिल्ली : भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ २०३० पर्यंत वार्षिक एक कोटी युनिटपर्यंत विक्रीचा टप्पा गाठेल आणि ५ कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी मंगळवारी सांगितले.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)च्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी भविष्यात भारत जगातील नंबर एक ऑटोमोटिव्ह उत्पादन केंद्र बनेल अशी आशा व्यक्त केली.

मंत्री पुढे म्हणाले की, २०३० पर्यंत संपूर्ण ईव्ही इकोसिस्टममध्ये भारतीय ईव्ही बाजाराची क्षमता २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ईव्ही वित्त बाजाराचा आकार अंदाजे ४ लाख कोटी रुपये होईल. लिथियम-आयन बॅटरीची किंमत आणखी खाली येण्याची अपेक्षा आहे.

आज भारतात सुमारे ३० लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे, असे गडकरी म्हणाले. एकूण विक्रीत इलेक्ट्रिक दुचाकींचा हिस्सा ५६ टक्के आहे. २०२३-२४ मध्ये ईव्हीच्या विक्रीत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलरमधील ४०० स्टार्टअप्सनी आधीच उत्पादन सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.

पीएलआय योजनेच्या माध्यमातून भारतात बॅटरी सेल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांमुळे अनेक कंपन्या देशात त्यांच्या सेल उत्पादन सुविधा उभारत आहेत. पुढे जाऊन भारत आमची लिथियम-आयन बॅटरी जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात करण्याच्या स्थितीत असेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in