Summer Car Care Tips : देशभरात कडक उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत, उत्तर भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत माणसांबरोबरच वाहनांनाही कडक उन्हापासून वाचवणं महत्त्वाचं आहे. कारण तीव्र उन्हाचा परिणाम वाहनांवरही होत आहे.
उन्हाळ्यात दुचाकी, कार किंवा इतर वाहनांबाबत खूप काळजी घेणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात कार सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत.
थंड जागेत करा पार्किंग:
तुमचं वाहन उन्हात पार्क करू नका, कारण उष्णतेमुळे तुमच्या कारच्या आतील भागात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय सूर्यप्रकाशामुळे कारमधील तापमानही वाढत जातं.
कार वॅक्सिंग:
जेव्हा सूर्यप्रकाश कारच्या विंडशील्ड ग्लासमधून आत जातो आणि तुमच्या डॅशबोर्डवरील प्लास्टिकला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे, तुमची कार नवीन ठेवण्यासाठी, कारचे वॅक्सिंग वर्षातून दोनदा करून घेणं महत्त्वाचं आहे. वॅक्सिंगमुळं तुमच्या कारचं थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण होईल. जर तुम्ही दीर्घकालीन उपाय शोधत असाल तर तुमच्या कारला सिरेमिक कोटिंग करणं अधिक चांगलं ठरू शकतं.
विंडशील्ड प्रोटेक्टर:
कारच्या विंडशील्डमध्ये बसवलेल्या काचेमुळे सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे तुमच्या कारमध्ये विंडशील्ड प्रोटेक्टर नक्कीच वापरा.
प्रचंड उष्णतेमुळे कारचे इंधन लवकर संपण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार तपासणं चांगलं. मुख्यतः कूलिंग पॉइंट, मोटर ऑइल आणि गियर फ्लुइड नियमितपणे तपासायला हवं.
उन्हाळ्यात कारमध्ये थेट सूर्यप्रकाश आल्यास कारच्या आतील लेदर सीट देखील खराब होऊ शकतात. त्यामुळं कारच्या आतील सीटचा रंग निवडताना हलका रंग निवडा. आपण गडद रंग निवडल्यास, जास्त उष्णतेच्या परिस्थितीत आपल्याला त्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.
एवढेच नाही तर कारच्या सीट वेळोवेळी धुतल्या पाहिजेत. मुख्यतः उन्हाळ्यात, कारची आतील बाजू गरम होते, त्यामुळे तुम्ही ती स्वच्छ करून बराच काळ थंड ठेवू शकता.
कारच्या खिडक्यांवर सनस्क्रीन स्टिकर्स वापरण्याबाबत प्रत्येक राज्याचे वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे तुमच्या राज्याच्या कायदेशीर नियमांनुसार तुम्ही योग्य सनस्क्रीन स्टिकर लावा, यामुळे कारला उष्णेतेचा कमी फटका बसेल.
इतर ऋतूंच्या तुलनेत, उन्हाळ्यात वाहनांची जास्त झीज होते, त्यामुळं या मोसमात तुमच्या कारची योग्य काळजी घेतली जाईल याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे.