Truecaller ला झुकतं माप देण्यासाठी वर्चस्वाचा गैरवापर? Google India विरुद्धची तक्रार CCI ने फेटाळली

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) गुगल इंडियाविरुद्धची तक्रार फेटाळली आहे.
संग्रहित छायाचिज्ञ
संग्रहित छायाचिज्ञ

नवी दिल्ली : भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) गुगल इंडियाविरुद्धची तक्रार फेटाळली आहे. यासंदर्भातील तक्रारीत टेक दिग्गज कंपनी गुगलने कॉलर आयडी आणि स्पॅम संरक्षण ॲप्ससाठी बाजारात ट्रू कॉलरला पसंती देण्यासाठी आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या तक्रारीत स्पर्धा कायद्याच्या उल्लंघनाचा कोणताही पुरावा आढळला नाही. तक्रार फेटाळताना, ‘सीसीआय’ म्हणाले, आयोगाला कायद्याच्या कलम ४ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे कोणतेही प्रथमदर्शनी प्रकरण गुगलविरुद्ध आढळले नाही.

रचना खैरा (माहिती देणाऱ्या) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यात गुगलने ट्रूकॉलरला खाजगी संपर्क माहिती सामायिक करण्यासाठी विशेष प्रवेश मंजूर केल्याचा आरोप केला आणि इतर ॲप्सना असे करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. पुढे, तिने आरोप केला की, या प्रथेमुळे बाजाराचा विपर्यास झाला आहे आणि ट्रूकॉलरची मक्तेदारी निर्माण झाली आहे. मात्र, आयोगाला आरोपात तथ्य आढळले नाही.

logo
marathi.freepressjournal.in