
मुंबई : ‘कॉइनडीसीएक्स’ क्रिप्टो एक्स्चेंजवर प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली आहे. या सहयोगाचा भाग म्हणून कॉइनडीसीएक्स ही मालमत्ता (ॲसेट्स) ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवस्थापनासाठी सुरक्षित संरचना पुरवेल. या भागीदारीमुळे जप्त केलेल्या मालमत्तेच्या हाताळणीसाठी नियमांची पूर्तता करणाऱ्या व सुरक्षित तरतुदीची निश्चिती होणार आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेच्या सर्वोच्च स्तरावरील सुरक्षेची खात्री करण्यासाठी आम्ही विशेष पथक तैनात केले आहे. या पथकातील कर्मचारी सुरक्षिततेच्या प्रगत प्रक्रियांचे जाणकार आहेत. यांमध्ये मल्टी-सिग्नेचर (बहुस्वाक्षरी) व मल्टी-पार्टी कम्प्युटेशन (एमपीसी) वॉलेट्सचा समावेश होतो. ‘ईडी’ला सहाय्य करण्याप्रती आमची बांधिलकी असल्याने आम्ही सर्वोत्तम दर्जाची सुरक्षितता, डिजिटल ॲसेट्स हे सर्व पुरवतो, असे कॉइनडीसीएक्सचे सहसंस्थापक सुमित गुप्ता म्हणाले.
ईडीच्या तपासात कॉइनडीसीएक्स मदत करते. या कंपनीने संचालनालयासोबत काम केले आहे, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होईल याची निश्चिती केली आहे आणि तातडीने संरक्षक खाती उघडण्याच्या कामातही सहाय्य केले आहे, असे ‘ईडी’च्या सहाय्यक संचालक परनीत कुमार यांनी सांगितले.
आपले ठोस सुरक्षितता उपाय, नियमनकेंद्री दृष्टिकोन आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणाप्रती बांधिलकी यांसाठी ओळखली जाणारी कॉइनडीसीएक्स उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करत आहे. भारतात एका संरक्षित, पारदर्शक आणि नियमांची पूर्तता करणाऱ्या डिजिटल ॲसेट परिसंस्थेची जोपासना करण्याप्रती कंपनी समर्पित आहे.