
नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी घसरली. परंतु क्रेमलिन हे भारतासाठी तेलाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे, असे युरोपियन थिंक टँकच्या मासिक ट्रॅकर अहवालात. फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉस्कोने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारत हा रशियन कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार बनला. आयात केलेल्या एकूण तेलाच्या एक टक्क्याहून कमी तेल खरेदी करणारा भारत आता एकूण तेल खरेदीच्या जवळपास ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. ही वाढ प्रामुख्याने झाली कारण किंमत मर्यादा आणि युरोपीय राष्ट्रांनी मॉस्कोमधून खरेदी टाळल्यामुळे रशियन कच्चे तेल इतर आंतरराष्ट्रीय व्यापार केलेल्या तेलाच्या तुलनेत सवलतीत उपलब्ध होते.
नोव्हेंबरमध्ये भारताच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत ५५ टक्क्यांनी घसरण झाली असून जून २०२२ नंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे, असे सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
रशिया हा भारताचा सर्वोच्च तेल पुरवठादार राहिला. त्यानंतर इराक आणि सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. चीनने रशियाच्या क्रूड निर्यातीपैकी ४७ टक्के तेल खरेदी केली आहे. त्यानंतर भारत (३७ टक्के), युरोपियन युनियन -ईयू (६ टक्के) आणि तुर्की (६ टक्के) तेल खरेदी केली आहे, असे ‘सीआरईए’ने संपूर्ण आकडेवारी न देता सांगितले.
रशिया प्रामुख्याने ईएसपीओ आणि सोकोल ग्रेडचे कच्चे तेल भारताला विकतो. कच्च्या तेलाव्यतिरिक्त भारताने रशियाकडून कमी प्रमाणात कोळसा खरेदी केला. ५ डिसेंबर २०२२ पासून नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत चीनने रशियाच्या सर्व कोळशाच्या निर्यातीपैकी ४६ टक्के खरेदी केली तर भारत (१७ टक्के), तुर्की (११ टक्के), दक्षिण कोरिया (१० टक्के) आणि तैवान (५) टक्के) खरेदी करतो.
भारताची आयात घटल्याने रशियन महसुलात मोठी घट
नोव्हेंबरमध्ये रशियन जीवाश्म इंधनाच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर घसरला. रशियाच्या पहिल्या पाच आयातदारांकडून मासिक निर्यातीमध्ये १७ टक्के (२.१ अब्ज युरो) योगदान दिले. नोव्हेंबरमध्ये भारताला कच्च्या तेलाच्या निर्यातीतून रशियन महसुलात टक्के मोठी घसरण झाली,” असे त्यात म्हटले आहे. नोव्हेंबरमध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या एकूण आयातीत मासिक आधारावर ११ टक्क्यांनी घट झाली होती, तर रशियन उलाढालीत सर्वाधिक ५५ टक्क्यांनी घसरण झाली. भारत आपल्या ८५ टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो, जे पेट्रोल आणि डिझेल रिफायनरीजसारख्या इंधनांमध्ये शुद्ध केले जाते.