खाद्यतेल आयात ३९ टक्क्यांनी वाढली; सूर्यफूल, सोयाबीन तेल आयातवाढीचा फटका

भारतातील खाद्यतेल आयात नोव्हेंबरमध्ये ३८.५ टक्क्यांनी वाढून १५.९ लाख टन झाली आहे. कच्च्या सूर्यफूल तेल आणि कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयातीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे उद्योगासंबंधीच्या ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे.
खाद्यतेल आयात ३९ टक्क्यांनी वाढली; सूर्यफूल, सोयाबीन तेल आयातवाढीचा फटका
Published on

नवी दिल्ली : भारतातील खाद्यतेल आयात नोव्हेंबरमध्ये ३८.५ टक्क्यांनी वाढून १५.९ लाख टन झाली आहे. कच्च्या सूर्यफूल तेल आणि कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयातीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे उद्योगासंबंधीच्या ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे.

सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने नोव्हेंबरमधील तेलाच्या (खाद्य आणि अखाद्य तेल) आयातीची आकडेवारी गुरुवारी जाहीर केली.

आकडेवारीनुसार, २०२४-२५ तेल विपणन वर्षाच्या पहिल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये तेलाची आयात ४० टक्क्यांनी वाढून १६ लाख २७ हजार ६४२ टन झाली आहे. ती मागील वर्षीच्या याच महिन्यात ११ लाख ६० हजार ५९० टन होती.

एकूण तेलाच्या आयातीपैकी नोव्हेंबरमध्ये खाद्यतेलाची आयात १५ लाख ९० हजार ३०१ टन झाली. ती गेल्या वर्षी याच महिन्यात ११ लाख ४८ हजार ९२ टन होती. अखाद्य तेलाची आयात नोव्हेंबर २०२३ मध्ये १२ हजार ४९८ टनवरून वाढून ३७ हजार ३४१ टन झाली.

खाद्यतेल श्रेणीत पामोलिनची आयात नोव्हेंबर २०२४ मध्ये २ लाख ८४ हजार ५३७ टन झाली. ती मागील वर्षीच्या याच कालावधीत १ लाख ७१ हजार ६९ टन होती. कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात वाढून ३ लाख ४० हजार ६६० टन झाली. ती मागील वर्षी १ लाख २८ हजार ७०७ टन होती. कच्च्या सोयाबीन तेलाची आयात ४ लाख ७ हजार ६४८ टनपर्यंत पोहोचली.

logo
marathi.freepressjournal.in