
वॉशिंग्टन : टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांची संपत्ती ५०० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. हा विक्रम करणारे ते पहिलेच उद्योगपती आहेत.
फोर्ब्स रिअल टाइम बिलियनेअर्स यादीनुसार, बुधवारी अमेरिकन मार्केट बंद झाल्यावर मस्क यांची निव्वळ संपत्ती ५०० अब्ज डॉलर (४४.३३ लाख कोटी रुपये) झाली होती.
टेस्लाच्या शेअरमध्ये ३.३१% वाढ झाल्याने मस्कच्या निव्वळ संपत्तीत वाढ दिसून आली. सध्या मस्कची निव्वळ संपत्ती ४९९.१ अब्ज डॉलर (४३.९९ लाख कोटी रुपये) आहे.
गेल्या १० वर्षांत मस्कची संपत्ती ३४ पट वाढली आहे. टेस्लाचा शेअर गेल्या एका वर्षात ७८% वाढला आहे. टेस्लाचे भांडवली मूल्य सुमारे १.४४ ट्रिलियन डॉलर (१२७ लाख कोटी रुपये) आहे आणि शेअरची किंमत ४५९.४६ डॉलर आहे. गेल्या एका वर्षात टेस्लाच्या शेअरने ७८% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यांत कंपनीचा शेअर ६२% वाढला आहे. भारतात टेस्लाचे दोन शोरूम मुंबई आणि दिल्लीमध्ये आहेत.
मस्क यांनी १२ व्या वर्षी व्हिडीओ गेम बनवून विकले होते. टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मस्क यांनी १० व्या वर्षी संगणक प्रोग्रामिंग शिकून घेतले. १२ व्या वर्षी 'ब्लास्टर' नावाचा व्हिडीओ गेम तयार केला, जो स्थानिक मॅगझिनने त्यांच्याकडून ५०० अमेरिकी डॉलरमध्ये खरेदी केला.
मंगळावर काॅलनी बसवण्याचे स्वप्न
१९९५ मध्ये त्यांनी वेब सॉफ्टवेअर कंपनी ‘झिप२’ स्थापन केली. कॉम्पॅकने १९९९ मध्ये ही कंपनी ३०७ दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केली. या व्यवहारामुळे मस्कला कंपनीत ७% हिस्सा देऊन २२ दशलक्ष डॉलर मिळाले. त्यानंतर मस्कच्या व्यवसायाची खरी सुरुवात झाली. मस्कने १९९९ मध्ये पेपल तयार केली. ईबेने २००२ मध्ये पेपल १.५ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली. या डीलमुळे मस्कला १८० दशलक्ष डॉलर मिळाले. तत्काळ नंतर मस्कने ‘स्पेसएक्स’ची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून मस्क मंगळ ग्रहावर कॉलनी बसवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे.