
नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामामुळे नोव्हेंबरमध्ये भारतातील पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली, असे सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीत शुक्रवारी दिसून आले.
पेट्रोलच्या विक्रीत वार्षिक आधारावर वाढ झाली, तर मान्सूनपासून मंदावलेली डिझेलची विक्री नोव्हेंबरमध्ये वाढ झाली.
९० टक्के इंधन बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या तीन सरकारी मालकीच्या कंपन्यांची पेट्रोलची विक्री नोव्हेंबरमध्ये ८.३ टक्क्यांनी वाढून ३.१ दशलक्ष टन झाली आहे, जे गेल्या वर्षी याच महिन्यात २.८६ दशलक्ष टन होती, तर डिझेलची मागणी ५.९ टक्क्यांनी वाढून ७.२ दशलक्ष टन झाली आहे. पावसामुळे वाहनांची वाहतूक कमी झाल्योन आणि कृषी क्षेत्राची मागणी कमी झाल्याने पावसाळ्यात पेट्रोल आणि डिझेलची विक्री मंदावली होती. पाऊस कमी झाल्यावर मात्र पेट्रोलची मागणी वाढली.
ऑक्टोबरमधील २.९६ दशलक्ष टन वापराच्या तुलनेत मासिक आधारावर नोव्हेंबरमध्ये पेट्रोल विक्री ४.७ टक्क्यांनी वाढली आहे. डिझेलची मागणी ऑक्टोबरमध्ये ६.५ दशलक्ष टन वापरापेक्षा जवळपास ११ टक्क्यांनी जास्त होती.
डिझेल हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे इंधन आहे, जे सर्व पेट्रोलियम उत्पादनांच्या वापरापैकी ४० टक्के आहे. देशातील एकूण डिझेल विक्रीमध्ये वाहतूक क्षेत्राचा हिस्सा ७० टक्के आहे. नोव्हेंबरमध्ये पेट्रोलचा वापर नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत १६.५ टक्के अधिक होता आणि कोविडमधील नोव्हेंबर २०२० पेक्षा ३३.५ टक्के अधिक होता.
डिझेलची मागणी नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत १.८ टक्के कमी होती, परंतु नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत ८.५ टक्के अधिक आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये जेट इंधन (एटीएफ) ची विक्री वार्षिक आधारावर ३.६ टक्क्यांनी वाढून ६५०,९०० टन झाली. ऑक्टोबरमध्ये विक्री झालेल्या ६३६,१०० टन इंधनाच्या तुलनेत ते मासिक आधारावर २.३ टक्क्यांनी जास्त होते.
पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच एटीएफची मागणीही आता कोविडपूर्व पातळीपेक्षा जास्त आहे.
एटीएफचा वापर नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत ११.३ टक्के आणि नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत १.९ टक्क्यांनी अधिक होता.
नोव्हेंबर २०२३४ मध्ये स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीची विक्री वार्षिक आधारावर ७.३ टक्क्यांनी वाढून २.७६ दशलक्ष टन झाली. एलपीजीचा वापर नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत ६.३ टक्क्यांनी जास्त आणि नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत १९.९ टक्क्यांनी अधिक आहे. ऑक्टोबरमधील २.७६ दशलक्ष टन एलपीजी वापराच्या तुलनेत मासिक आधारावर एलपीजीची मागणीत फारसा बदल झाला नाही, असे आकडेवारी सांगते.