थेट परदेशी गुंतवणुकीच्या आढाव्यासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणा अस्तित्वात येणार

देशात गुंतवणुकीनंतरचा आढावा आणि देखरेखीसाठी परदेशी गुंतवणूक नियामक यंत्रणा स्थापन करण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
थेट परदेशी गुंतवणुकीच्या आढाव्यासाठी 
स्वतंत्र नियामक यंत्रणा अस्तित्वात येणार
Published on

नवी दिल्ली : देशात गुंतवणुकीनंतरचा आढावा आणि देखरेखीसाठी परदेशी गुंतवणूक नियामक यंत्रणा स्थापन करण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या हा विचार केवळ चर्चेच्या पातळीवर आहे, असेही सांगण्यात आले.

सर्व देश त्यांच्या देशात येणाऱ्या एफडीआयवर (परकीय थेट गुंतवणुकीवर) देखरेख करतात, असे निदर्शनास आले असून भारतातही अशीच एखादी देखरेख यंत्रणा असावी, असे सुचविण्यात येते. त्यामुळे अशी नवी यंत्रणा ही एक प्रकारे परदेशी निधीवर देखरेख असेल.

देशात येणारी एफडीआय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे आणि कायदेशीर स्रोतांपासून उद्भवते हे तपासण्यात ही यंत्रणा साहाय्यकारी ठरू शकते. स्थिर धोरणे, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, गुंतवणुकीचा अधिक परतावा आणि कुशल कर्मचारी वर्ग यामुळे थेट विदेशी गुंतवणुकीसाठी भारत हे प्रमुख ठिकाण मानले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in