गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर

2024 Force Gurkha Launched : फोर्स मोटर्सने Mahindra Thar 5-doorला टक्कर देण्यासाठी नवीन फोर्स गुरखा लॉन्च केली आहे. फोर्स गुरखा ही भारतातील सर्वोत्तम ऑफ-रोड एसयूव्हींपैकी एक आहे.
force gukha
force gukhaforce gukha

2024 Force Gurkha Launched : अलीकडच्या काळात देशात ऑफरोडींग कारची मागणी कमालीची वाढली आहे. या प्रकारामध्ये देशात Mahindra Tharनं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. ऑफरोडींग SUVना भारतीय ग्राहकांची मिळणारी पसंती पाहता फोर्स मोटर्सनं अलीकडेच Force Gurkha ही दमदार SUV लॉन्च केली होती. आता फोर्स मोटर्सनं Mahindra Thar 5-doorला टक्कर देण्यासाठी नवी फोर्स गुरखा लॉन्च केली आहे.

2024 फोर्स गुरखा एसयूव्ही प्रथमच पाच-दरवाजांसह लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीनं 7-सीटर कॉन्फिगरेशनसह ही SUV लॉन्च केली आहे. नवीन Force Gurkha 5 door मॉडेलची लांबी 4,390 मिमी, रुंदी 1,865 मिमी आणि उंची 2,095 मिमी आहे, तर व्हीलबेस 2,825 मिमी लांब आहे.

Force Gurkha 3 doorची लांबी 3,965 मिमी, रुंदी 1,865 मिमी, उंची 2,080 मिमी आणि व्हीलबेस 2,400 मिमी आहे. गुरखा SUV ला साइड टायर्स (255/65 R18) वर नवीन आकर्षक 18-इंच अलॉय व्हील्स दिले गेले आहेत.

2024 फोर्स गुरखा पॉवरट्रेन: फोर्स गुरखाच्या दोन्ही प्रकारांना अधिक शक्तिशाली मर्सिडीज-सोर्स्ड 2.6-लिटर OM616 टर्बोडिझेल इंजिन दिलं गेलं आहे. हे इंजिन 3,200rpm वर 138bhp आणि 1,400 आणि 2,600rpm दरम्यान पीक टॉर्क 320Nm निर्माण करण्यास सक्षम आहे.

हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि चार-चाकी ड्राइव्हसह दिले जात आहे. नवीन डिझाइनमध्ये 'गुरखा' बॅजसह एक नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) सह रेट्रो-स्टाइल गोलाकार एलईडी हेडलॅम्प आणि मध्यभागी छोट्या एअर डॅम तसेच गोल फॉग लॅम्पसह ब्लॅक फ्रंट बंपर दिला गेला आहे.

2024 Force Gurkha वैशिष्ट्ये:

या SUV च्या आतील भागात 9-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिला गेला आहे, जो Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. नवीन गुरखाची ऑल-मेटल बॉडी फ्रंट क्रॅश-कम्लेंट डिझाइनमध्ये आहे.

सुरक्षा वैशिष्ट्यांवर विशेष भर:

गुरखाने सुरक्षा वैशिष्ट्यांवर विशेष भर दित त्यांना अद्यतनित केलं आहे . आता कारमध्ये ABS आणि EBD सह ड्युअल एअरबॅग्ज मिळतात. नवीन गुरखा 5-दरवाजा मॉडेलसह तुम्ही कठीण रस्ते, पर्वतांवर सहजतेनं प्रवास करू शकता.

किती असेल किंमत:

कंपनीनं 5-door Force Gurkha सोबतच 3-door Force Gurkha सुद्धा लॉन्च केली आहे. 2024 फोर्स गुरखा 3-door व्हेरियंटची किंमत सुमारे 16.75 लाख रुपये आहे तर नवीन 5-doorची किंमत 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

कंपनीनं 2024 Force Gurkhaसाठी बुकिंग सुरु केलं आहे. इच्छुक ग्राहक 25,000 रुपये टोकन रक्कम भरून ही SUV बुक करू शकतील. 2024 फोर्स गुरखाची डिलिव्हरी मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल.

logo
marathi.freepressjournal.in