१७.७६ अब्ज डॉलरने विदेशी गंगाजळी घसरली

भारताची विदेशी गंगाजळी १५ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १७.७६ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५७.८९२ अब्ज डॉलरवर आली, असे आरअबीआयने शुक्रवारी सांगितले. ८ नोव्हेंबर रोजी संपलेल्या मागील अहवाल आठवड्यात, एकूण गंगाजळी ६.४७७ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६७५.६५३ अब्ज डॉलर झाली होती.
१७.७६ अब्ज डॉलरने विदेशी गंगाजळी घसरली
Published on

मुंबई : भारताची विदेशी गंगाजळी १५ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १७.७६ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५७.८९२ अब्ज डॉलरवर आली, असे आरअबीआयने शुक्रवारी सांगितले. ८ नोव्हेंबर रोजी संपलेल्या मागील अहवाल आठवड्यात, एकूण गंगाजळी ६.४७७ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६७५.६५३ अब्ज डॉलर झाली होती.

सप्टेंबरच्या अखेरीस ७०४.८८५ अब्ज अमेरिकन डॉलरचा सार्वकालिक उच्चांक गाठणारी गंगाजळी आता अनेक आठवड्यांपासून घसरत आहे. अशा वेळी रुपयाही दबावाखाली होता. १५ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात गंगाजळीचा एक प्रमुख घटक विदेशी चलन मालमत्ता, १५.५४८ अब्ज डॉलरने घटून ५६९.८३५ अब्ज डॉलर झाली, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून आले.

आठवडाभरात सोन्याचा साठा २.०६८ अब्ज डॉलरने घटून ६५.७४६ अब्ज डॉलर झाला, असे आरबीआयने सांगितले. तर स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) ९४ दशलक्ष अमेरिकन डॉलरने कमी होऊन १८.०६४ अब्ज डॉलर झाले आहेत. तसेच आयएमएफमधील भारताची राखीव स्थिती देखील अहवालाच्या आठवड्यात ५१ दशलक्ष अमेरिकन डॉलरने घसरून ४.२४७ अब्ज डॉलर झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत दिसून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in