फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

ही इलेक्ट्रिक स्कूटर चालविण्यासाठी कोणत्याही नोंदणीची किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही, पाहा कारण...
फुजियामा थंडर
फुजियामा थंडरफुजियामा ईव्ही

मुंबई: अलीकडच्या काळात भारतात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींचा वापर वाढत आहे. त्यामुळंच अनेक कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक वाहनं लॉन्च करत आहेत. आता फुजियामाने (Fujiyama EV) नुकतीच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देशात लॉन्च केली आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर फुजियामा थंडर प्लस (Fujiyama Thunder Plus) या नावाने सादर केली आहे. ही स्कूटर दोन प्रकारांमध्ये (Thunder VLRA आणि Thunder LI) उपलब्ध आहे.

फुजियामा ईव्ही थंडर (Thunder LI) व्हेरिएंट 64,990 रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीमध्ये सादर केली आहे. फुजियामा थंडरच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये नेमकं काय आहे खास? चला जाणून घेऊया. प्रकारांची फीचर्स आणि वैशिष्ट्ये तपशीलवार समजावून घेऊ.

फुजियामा थंडर व्हीएलआरए (Fujiyama Thunder VLRA) ची फीचर्स : या इलेक्ट्रिक स्कूटरचं टॉप स्पीड 25kmph आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250 वॅटची मोटर वापरली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. या स्कूटरमध्ये 48V 28AH VLRA बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ही कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने, ती चालविण्यासाठी कोणत्याही नोंदणीची किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

फुजियामा थंडर एलआय (Fujiyama Thunder Li) : ही देखील एक स्लो स्पीड प्रकारातील स्कूटर आहे. थंडर व्हीएलआरए व्हेरियंटप्रमाणेच या व्हेरियंटमध्ये 250 वॅटची मोटर देखील वापरण्यात आली आहे. ती ताशी 25 किमी वेगाने धावते.

ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 90 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या स्कूटरमध्ये 60V 30AH VLRA बॅटरी वापरण्यात आली आहे. ती पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात.

खास वैशिष्ट्ये: या दोन्ही स्कूटरमध्ये अनेक खास टेक्निकल फीचर्स आहेत. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स, रिमोट लॉक आणि अनलॉक फीचरही उपलब्ध आहे. याशिवाय अँटी थेफ्ट अलर्ट सुविधाही उपलब्ध आहे.

कंपनीची ही उत्पादनं लोकप्रिय-

फुजियामा भारतीय बाजारपेठेत दोन प्रकारांमध्ये आपली इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करते. फुजियामा स्पेक्ट्रा आणि नवीन थंडर प्लस हे लो-स्पीड सेगमेंटमध्ये असताना, कंपनी हाय-स्पीड प्रकारांतर्गत क्लासिक आणि ओझोन मॉडेल्सची विक्री करते.

यापैकी क्लासिक मॉडेल हे कंपनीचे प्रमुख उत्पादन आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग ताशी 60 किलोमीटर आहे. यामध्ये 3000 वॅटची मोटर वापरण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ती 100 किलोमीटरची रेंज देते.

स्वस्त आणि अत्याधुनिक ईव्ही-

या स्कूटरमध्ये 2.05 किलोवॅटची बॅटरी आहे. या स्कूटर्सची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच कंपनी इतर नवीन उत्पादनांवरही लक्ष केंद्रित करत आहे. फुजियामा स्वस्त आणि अत्याधुनिक ईव्ही प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

कंपनीकडे सध्या 100+ डीलरशिप, 280+ ग्राहक टचपॉइंट्स आहेत. गेल्या 10 महिन्यांत कंपनीने 28,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. 2028 पर्यंत 25 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली बाजारपेठ वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

logo
marathi.freepressjournal.in