गौतम अदानी २०२८ पर्यंत दुसरे ट्रिलिनियर असणार, मस्क २०२७ पर्यंत जगातील पहिले ट्रिलिनियर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क २०२७ पर्यंत जगातील पहिले ट्रिलिनियर बनू शकतात.
गौतम अदानी २०२८ पर्यंत दुसरे ट्रिलिनियर असणार, मस्क २०२७ पर्यंत जगातील पहिले ट्रिलिनियर
Published on

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क २०२७ पर्यंत जगातील पहिले ट्रिलिनियर बनू शकतात. इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला, खासगी रॉकेट कंपनी स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) यांची मालकी असलेल्या मस्क यांच्या संपत्तीत वार्षिक सरासरी ११० टक्के वाढ होत आहे, असे अब्जाधीशांच्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्या संस्थेच्या इन्फॉर्मा कनेक्ट ॲकॅडमीच्या अहवालात म्हटले आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, मस्क २३७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. ट्रिलियनियर दर्जा प्राप्त करणारे दुसरे उद्योजक भारतीय उद्योगपती गौतम अदानी असतील, असे अहवालात म्हटले आहे.

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती वार्षिक सरासरी १२३ टक्के वाढत आहे आणि ती आणखी काही वर्षे याच गतीने वाढत राहिल्यास २०२८ पर्यंत अदानी ट्रिलिनियर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असतील. अदानी सध्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत १३ व्या स्थानी असून त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरवर आहे.

आतापर्यंत, जगातील फक्त आठ कंपन्या ट्रिलियन डॉलरचे बाजार भांडवल पार करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट, ॲपल, एनव्हीडिया, अल्फाबेट, ॲमेझॉन, सौदी अरामको, मेटा आणि अलीकडेच या यादीत सामील झालेल्या वॉरन बफेची कंपनी बर्कशायर हॅथवे यांचा समावेश आहे.

संभाव्य अब्जाधीशांच्या यादीत आश्चर्यकारकपणे चीप आणि सेमीकंडक्टर कंपनी एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचे नाव आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते १८ व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती ९० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गचा देखील या यादीत समावेश आहे आणि झुकेरबर्ग ट्रिलियनच्या यादीत पोहोचण्यासाठी सहा वर्षे - म्हणजे २०३० पर्यंत लागतील, असे अहवालात सूचित केले आहे.

मुकेश अंबानी २०३३ मध्ये ट्रिलिनियर

१११ अब्ज अमेरिकन डॉलरच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत असलेले प्रतिस्पर्धी अंबानी २०३३ मध्ये ट्रिलिनियर होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे. तेल ते दूरसंचार आणि रिटेल व्यवसायतील रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचे बाजारमूल्य २०३५ मध्ये ट्रिलियन-डॉलर असेल. अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही एकमेव भारतीय कंपनी असेल, जी ट्रिलियन बाजारमूल्य गाठेल. तसेच ट्रिलियन-डॉलर बाजारमूल्य गाठणाऱ्या कंपन्यांमध्ये तैवानची सेमीकंडक्टर निर्माता कंपनी टीएसएमसीचा समावेश असेल, २०२५ मध्ये तिचे बाजारमूल्य ८९३.७ अब्ज डॉलर होणे अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in