तिमाहीत जीडीपी वृद्धी दराचा १५ महिन्यांचा नीचांक, एप्रिल-जूनमध्ये ६.७ टक्के

भारताचा जीडीपी वृद्धी दर एप्रिल-जून २०२४-२५ मध्ये ६.७ टक्क्यांपर्यंत घसरून १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.
तिमाहीत जीडीपी वृद्धी दराचा १५ महिन्यांचा नीचांक, एप्रिल-जूनमध्ये ६.७ टक्के
Canva
Published on

नवी दिल्ली : भारताचा जीडीपी वृद्धी दर एप्रिल-जून २०२४-२५ मध्ये ६.७ टक्क्यांपर्यंत घसरून १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मुख्यत्वे कृषी आणि सेवा क्षेत्रांच्या खराब कामगिरीचा हा फटका असल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत दिसून आले.

२०२२-२३ च्या एप्रिल-जून तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी दर) ८.२ टक्क्यांनी वाढला होता. तथापि, चीनचा एप्रिल-जून २०२४ मध्ये जीडीपी दर ४.७ टक्के राहिल्यामुळे भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली. तर २०२३ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी दर ६.२ टक्क्यांचा यापूर्वीचा नीचांक नोंदवला होता.

आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत भारताची जीडीपी वाढ अपेक्षितपणे पाच तिमाहीपूर्वीच्या ७.८ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत मंदावला. तथापि, यंदा एप्रिल - जून तिमाहींमध्ये ‘जीव्हीए’ वाढ आश्चर्यकारकपणे वेगवान झाली असून हा दर ६.३ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आमच्या मते, जीडीपी वाढ मंदावणे हे धोक्याचे कारण नाही, असे इक्रा चीफ इकॉनॉमिस्ट, प्रमुख- संशोधन आणि आऊटरीच, आदिती नायर म्हणाल्या.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार कृषी क्षेत्रातील सकल मूल्यवर्धित (जीव्हीए) वाढ २०२३-२४ च्या एप्रिल-जून तिमाहीत ३.७ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर घसरली. ‘आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा’ जीव्हीएमधील विस्तार देखील वर्षापूर्वीच्या तिमाहीत १२.६ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांवर घसरला.

logo
marathi.freepressjournal.in