भू-राजकीय तणावामुळे भारतीय रोजगारावर परिणाम; ६३ टक्के कंपन्यांनुसार भरती थांबवण्यात येतेय: अहवाल

मध्य पूर्वेतील युद्धांसह भू-राजकीय तणावाचा भारताबाहेर रोजगारासाठी जाणाऱ्या कामगारांना फटका बसला आहे. कारण ६३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी पुष्टी केली की, त्यांच्या कंपन्या भरती थांबवत आहेत किंवा सद्यस्थितीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
भू-राजकीय तणावामुळे भारतीय रोजगारावर परिणाम; ६३ टक्के कंपन्यांनुसार भरती थांबवण्यात येतेय: अहवाल
Published on

मुंबई : मध्य पूर्वेतील युद्धांसह भू-राजकीय तणावाचा भारताबाहेर रोजगारासाठी जाणाऱ्या कामगारांना फटका बसला आहे. कारण ६३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी पुष्टी केली की, त्यांच्या कंपन्या भरती थांबवत आहेत किंवा सद्यस्थितीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

६३ टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपन्या भरती थांबवत आहेत किंवा सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत तर १५ टक्के कंपन्यांनी भू-राजकीय तणाव वाढत असताना कंत्राट-आधारित किंवा फ्रीलांस काम देऊन बदल केल्याचे नमूद केले आहे, असे स्टाफिंग सोल्यूशन्स आणि एचआर सेवा प्रदात्या जीनियस कन्सल्टंट्सच्या अहवालात म्हटले आहे.

१२ मे ते ६ जून दरम्यान देशातील विविध क्षेत्रातील २,००६ कर्मचाऱ्यांमधील ऑनलाइन सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे. पुढे, अहवालात असे दिसून आले की, मुलाखत घेतलेल्या ३६ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, भू-राजकीय अस्थिरतेमुळे त्यांच्या पगारात वाढ, बोनस किंवा मूल्यांकनावर परिणाम झाला आहे.

२१ टक्क्यांहून अधिक कामगारांनी सांगितले की, कामाचा ताण आणि प्रकल्पांच्या वेळेत वाढ झाली आहे, तर २२ टक्के लोकांनी असे म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा प्रवास विस्कळीत झाला आहे आणि २१ टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, कंपन्यांचे मनोबल आणि नोकरीचा आत्मविश्वास घसरत आहे, असे त्यात म्हटले आहे.

सर्वेक्षणात असे आढळून आले की, कंपनी कपातीची किंवा भरती करत नसल्याचे दिसून आले. तर ५५ टक्के प्रतिसादकर्ते कौशल्य वाढवत आहेत किंवा नवीन प्रमाणपत्रांसाठी नोंदणी करत आहेत आणि ३१ टक्के नवीन नोकरीच्या संधी किंवा ‘बॅकअप’ भूमिका शोधू लागले आहेत, असे जिनियस कन्सल्टंट्सचे अध्यक्ष आणि एमडी आर. पी. यादव म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in