दिवाळीपर्यंत १.८५ लाख कोंटींच्या भेटवस्तूंची खरेदी होणार, मिठाई पहिली पसंती : सर्वेक्षण

सणासुदीच्या काळात भेटवस्तुंची खरेदी सर्वाधिक होण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम विक्रीच्या आकडेवारीवरही दिसून येत आहे.
दिवाळीपर्यंत १.८५ लाख कोंटींच्या भेटवस्तूंची खरेदी होणार, मिठाई पहिली पसंती : सर्वेक्षण
Published on

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात भेटवस्तुंची खरेदी सर्वाधिक होण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम विक्रीच्या आकडेवारीवरही दिसून येत आहे. दिवाळीपर्यंत शहरी भारतीयच चॉकलेट, बेकरी, मिठाई आणि इतर भेटवस्तू खरेदीवर १.८५ लाख कोटी रुपये खर्च करतील. सप्टेंबरपासून आतापर्यंत लोकांनी १.२ लाख कोटी रुपयांच्या भेटवस्तू खरेदी केल्या आहेत, असे लोकल सर्कलच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

यासोबतच दुकानातून भेटवस्तू खरेदीबरोबरच ऑनलाइन शॉपिंगमध्येही वाढ होत असल्याचा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे. सणासुदीच्या ऑफर्समुळे ३६ टक्के लोक ऑनलाइन भेटवस्तू खरेदी करत आहेत. हे सर्वेक्षण ३१४ जिल्ह्यांतील ३१ हजार शहरी कुटुंबांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे.

५३ टक्के शहरी लोक बाजारात जाऊन भेटवस्तू खरेदी करतात

भेटवस्तू खरेदी करण्याच्या सवयीवरील सर्वेक्षणात म्हटले आहे की, ५३ टक्के शहरी लोक स्थानिक बाजारपेठेत जातात आणि स्वतः भेटवस्तू खरेदी करतात. त्याच वेळी, २१ टक्के लोक ऑनलाइन खरेदी करतात. मात्र, दोघेही आपापल्या नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या घरी जाऊन भेटवस्तू देण्यास प्राधान्य देतात. केवळ १५ टक्के लोक ऑनलाइन खरेदी करत आहेत आणि नातेवाईक किंवा मित्रांच्या घरच्या पत्त्यावर डिलिव्हरी मिळवतात.

गिफ्ट देण्यासाठी पहिली पसंती मिठाई

भेटवस्तु देण्यासाठी मिठाईची सर्वाधिक खरेदी होत असून मिठाई- बेकरी खरेदीदारांची टक्केवारी सर्वाधिक ५३ टक्के आहे. तर सुकामेवा ४८ टक्के, परफ्यूम, मेणबत्ती २७ टक्के, स्वयंपाकघरातील भांडी - १८ टक्के, होम फर्निशिंग १२ टक्के, ट्रे, क्रॉकरी १२ टक्के खरेदी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in