सोने २०२५ मध्ये ९० हजारांवर?

भू-राजकीय ताणतणाव आणि जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता कायम राहण्याच्या संकेतांमुळे नवीन वर्षात देशांतर्गत सराफा बाजारात सोने ८५ हजार रुपये ते ९० हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
सोने २०२५ मध्ये ९० हजारांवर?
Published on

नवी दिल्ली : भू-राजकीय ताणतणाव आणि जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता कायम राहण्याच्या संकेतांमुळे नवीन वर्षात देशांतर्गत सराफा बाजारात सोने ८५ हजार रुपये ते ९० हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनच सोन्याची खरेदी होत आहे. परंतु भू-राजकीय संकट कमी झाल्यास आणि रुपयाची घसरण झाल्यास मौल्यवान धातू कमकुवत होऊ शकतो, असेही सांगण्यात येते.

सध्या स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव ७९,३५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) वर फ्युचर्स ट्रेडमध्ये ७६,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. मौल्यवान धातूच्या किमती २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर २३ टक्के वाढला. या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी पिवळ्या धातूने ८२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमचा सार्वकालिक उच्चांक गाठला. चांदीने ३० टक्क्यांच्या वाढीसह या उत्कृष्ट कामगिरीला प्रतिकिलो १ लाख रुपयांची पातळी ओलांडली.

जागतिक स्तरावर, कॉमेक्स गोल्ड फ्युचर्सने वर्षाची सुरुवात सुमारे २,०६२ अमेरिकन डॉलर प्रति औंस केली आणि ३१ ऑक्टोबर रोजी २,७९० अमेरिकन डॉलर प्रति औंसच्या शिखरावर पोहोचल्याचे पाहता २८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. जागतिक अनिश्चिततेमध्ये सोने खरेदीचे आकर्षण अधिक मजबूत झाले.

भू-राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकेची खरेदी आणि प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात कपात झाल्यास आदी कारणांनी मौल्यवान धातू २०२५ मध्येही मजबूत कामगिरी करणारे आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

२०२५ मध्ये सोन्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, जरी २०२४ च्या तुलनेत वाढीचा वेग मध्यम असू शकतो, असे एलकेपी सिक्युरिटीज व्हीपी संशोधन विश्लेषक- कमोडिटी आणि चलन, जतीन त्रिवेदी यांनी पीटीआयला सांगितले.

देशांतर्गत सोन्याच्या किमती कमी लक्ष्य गृहित धरले तरी रु. ८५ हजारांपर्यंत पोहोचण्याची आणि जास्तीत जास्त ९० हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तर चांदीच्या किमती किमान १.१ लाख रुपये प्रति किलो वाढण्याची अपेक्षा आहे आणि भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास किंवा वाढल्यास १.२५ लाखांपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in