Union Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर काय होणार स्वस्त अन् काय महागणार? जाणून घ्या

Union Budget 2024 : निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नेमकं काय महागणार आणि काय स्वस्त होणार? हे स्पष्ट झालं आहे.
Union Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर काय होणार स्वस्त अन् काय महागणार? जाणून घ्या
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. आता निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नेमकं काय महागणार आणि काय स्वस्त होणार? हे स्पष्ट झालं आहे. मोबाईल फोन, चार्जर, मासे तसेच चामड्यापासून बनवलेले सामान, सोने चांदीचे दागिने इत्यादी गोष्टी स्वस्त होणार आहेत. तर पीव्हीसी बॅनर आयात करणं, तसेच दूरसंचार उपकरणांची आयातही महागणार आहे.

'या' गोष्टी होणार स्वस्त:

  • मोबाईल फोन आणि चार्जरवरील सीमाशुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्यामुळं स्मार्टफोन आणि चार्जर स्वस्त होणार

  • ई-कॉमर्सवरील टीडीएस रेट १ टक्क्यावरून ०.१ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

  • सोने-चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा, त्यामुळे सोने-चांदी स्वस्त होणार

  • कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ३ प्रमुख औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे.

  • सोलार पॅनलची निर्मिती करताना वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंच्या करात देखील सूट

  • माशांच्या खाद्यावरील सीमाशुल्क ५ टक्क्यांनी कमी केलं आहे. त्यामुळे मासे स्वस्त होण्याची शक्यता आहे.

  • प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात देखील ६.४ टक्क्यांची कपात

'या' गोष्टी होणार महाग:

  • काही दूरसंचार उपकरणांची आयात महागणार

  • पीव्हीसी फ्लेक्स बॅनर आयात करणं

  • इक्विटी गुंतवणूक कर १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे. त्यामुळं एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेली इक्विटी गुंतवणूक महागणार

  • एक वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या शेअर्सवरील कर १० टक्क्यांवरून १२.५ टक्के करण्यात आलाय.

logo
marathi.freepressjournal.in