२०२५ मध्ये सोने चमकणार : अहवाल

सोन्याचा बाजार संपूर्ण वर्ष २०२४ मध्ये उत्साही राहिला. खरेदीदारांना उत्तम परतावा मिळाला, तर आता सोन्यातील गुंतवणूकदारांना नवीन वर्षात मौल्यवान धातू आणखी चमकेल, अशी अपेक्षा आहे.
२०२५ मध्ये सोने चमकणार : अहवाल
Published on

नवी दिल्ली : सोन्याचा बाजार संपूर्ण वर्ष २०२४ मध्ये उत्साही राहिला. खरेदीदारांना उत्तम परतावा मिळाला, तर आता सोन्यातील गुंतवणूकदारांना नवीन वर्षात मौल्यवान धातू आणखी चमकेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये सोन्याने सुमारे २७ टक्के परतावा दिल्याचे उपलब्ध सार्वजनिक आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या काही वर्षांतील देशांतर्गत परिस्थिती पाहता २०२१ चा अपवाद करता २०१६ पासून सोन्याच्या किमतीत साततत्याने वाढ झाली आहे.

जपानमधील सर्वात मोठी आणि जगातील मोठ्या बँकांपैकी एक एमयूएफजी बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, सोन्यामध्ये तेजी २०२५ पर्यंत चालू राहील. त्याची दोन प्रमुख कारणे आहेत- भू-राजकीय जोखमींविरुद्ध सामना करणे आणि उदयोन्मुख बाजारपेठांमधील मध्यवर्ती बँकेची मागणी कायम राहील. सध्याच्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा वाढवला आहे. सोने हा नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात, अमेरिकन धोरणातील अनिश्चितता आणि वाढलेला भू-राजकीय तणाव आदी कारणांनी दीर्घ कालावधीसाठी सोन्याचा साठा करणे आकर्षक ठरते. पर्यायाने आर्थिक आणि चलनविषयक संस्था, गुंतवणूकदार आणि सट्टेबाज यांच्याकडून मागणी वाढू शकते, असे या अहवालात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in