नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत आणखी ५० विमानतळे उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि पुढील कामांसाठी तयारी केली आहे. गेल्या १० वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होऊन १५७ झाली आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी गुरुवारी सांगितले. नायडू म्हणाले की, पुढील पाच वर्षांत आणखी ५० आणि पुढील २० वर्षांत आणखी २०० विमानतळ विकसित केले जाण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय राजधानीत एअरबस इंडिया आणि दक्षिण आशिया मुख्यालय - प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री बोलत होते. रोजगार निर्मिती आणि व्यावसायिक उलाढालींना चालना देणारी विमानतळ इकोसिस्टम आणखी विकसित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.