प्लास्टिक हरित भविष्यासाठी आवश्यक : योग्य पद्धतीने पुनर्वापर जरुरी

भारताचा हरित आराखडा : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्लास्टिक पुनर्वापर संदर्भातील यशामुळे पर्यावरणपूरक जागतिक मॉडेलची निर्मिती
प्लास्टिक हरित भविष्यासाठी आवश्यक : योग्य पद्धतीने पुनर्वापर जरुरी
Published on

भारताचा हरित आराखडा : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्लास्टिक पुनर्वापर संदर्भातील यशामुळे पर्यावरणपूरक जागतिक मॉडेलची निर्मिती

प्रदूषण रोखण्यासाठी, आपल्या साधनसंपत्तीची बचत करण्यासाठी आणि नवकल्पनांसाठी प्लास्टिक महत्त्वाचे का आहे - तसेच योग्यपणे पुनर्वापर केल्यामुळे प्लास्टिकचे तोटे कसे कमी होतात.

योग्य वापर केल्यास प्लास्टिक हे पर्यावरणात पर्यावरणाचे स्नेही आहे, ते प्रदूषण कमी करू शकते आणि जागतिक व्यापाराला सहाय्य करू शकते, असे इकॉनॉमिस्ट च्या २०२५ च्या महत्त्वपूर्ण विश्लेषणात म्हटले आहे. प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर होत असतानाच अत्याधुनिक पद्धतीने प्लास्टिकचा पुनर्वापर आणि यासंदर्भात धोरणात बदल होत असल्याने, आता चित्र बदलते आहे. आता प्लास्टिक हा भस्मासुर राहिला नसून जर ते योग्यपणे हाताळले तर ते हरित आणि समतावादी जगासाठी महत्त्वाचे ठरेल. कसे ते पहा....

सध्याच्या पर्यावरणप्रेमी जगात प्लास्टिक कडे पाहून लोक सर्रास नाके मुरडतात. मात्र इकॉनॉमिस्टच्या २०२५ च्या वृत्ताने हा समज खोडून काढला आहे. त्यानुसार प्लास्टिक हे आधुनिक जगासाठी फक्त आवश्यकच नाही, तर ते प्लास्टिक ऐवजी वापरण्यात येणाऱ्या पर्यायांपेक्षाही पर्यावरणपूरक आहे. वस्तू साठवण्यासाठी फ्रीज ऐवजी प्लास्टिक वेस्टणाचा वापर केल्यास किंवा जड काचेच्या तुलनेत प्लास्टिकचा वापर केल्यास वाहतुकीसाठी जळणाऱ्या इंधनाची बचत लक्षात घेता प्लास्टिक हे पर्यावरणपूरक असल्याचे दिसून येते. प्लास्टिक नसेल तर पर्यायी जड वस्तूंच्या जागतिक व्यापारासाठी लागणाऱ्या इंधनाच्या कार्बन-डाय-ऑक्‍साईडमुळेच हे व्यापार क्षेत्र कोलमडून पडेल असे इकॉनॉमिस्टने म्हटले आहे.

पर्यावरणाच्या गणितांकडे कोणाचेही लक्ष नाही

प्लास्टिकच्या कचऱ्यावर पुष्कळ टीका होते. मात्र प्लास्टिकमुळे अंतिमतः पर्यावरणाला होणाऱ्या फायद्यांचा कोणीही विचार करत नाही. प्लास्टिक पॅकिंग ऐवजी कागद किंवा धातूच्या साह्याने पॅकिंग तयार केले तर त्यामुळे प्रदूषित वायूंच्या उत्सर्जनात भयावह म्हणजे दुप्पट ते तिप्पट वाढ होईल असे गणित इकॉनॉमिस्टने मांडले आहे. कागद किंवा धातू यांचा पुनर्वापर केल्यानंतर देखील हीच परिस्थिती राहील. उदाहरण द्यायचे झाले तर अर्जेंटिनातील मांस हे हलक्या प्लास्टिकच्या पॅकिंग मधून इंग्लंडच्या सुपर मार्केटमध्ये किंवा अशाच प्रकारे जीवनावश्यक औषधे दूर दूरच्या गावांमध्ये सहजतेने जाऊ शकतात. त्याऐवजी त्यांना धातूच्या डब्याचे पॅकिंग असते तर ते जवळपास अशक्य झाले असते. आरोग्य सेवा क्षेत्रातही एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकपासून केलेल्या वस्तूंमुळे तेथे संसर्ग टाळतो. तर बांधकाम क्षेत्रात देखील पीव्हीसी चे पाईप एरवीच्या सिमेंटच्या पाईप पेक्षा ३० टक्के स्वस्त पडतात. इकॉनॉमिस्टच्या विधानानुसार प्लास्टिकच्या कलाकुसरीच्या वस्तू या केवळ हस्तिदंताला पर्यायच झाल्या नाहीत, तर त्यामुळे आफ्रिकेच्या जंगलातली हत्तींची शिकारही थांबली आहे.

प्लास्टिक पुनर्वापराचा हायटेक मार्ग

९० % प्लास्टिक हे एकदा वापरल्यानंतर निरुपयोगी ठरते आणि फक्त नऊ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होतो. पण यातील एका क्रांतिकारक उपायाची माहिती देखील इकॉनॉमिस्टने दिली आहे. जे प्लास्टिक पुनर्वापर करण्यायोग्य नाही त्याचा देखील पिरोलिसीस किंवा एन्झाईम पद्धतीने पुनर्वापर केल्यास, त्यापासून उच्च दर्जाचे साहित्य तयार होते. त्याचा वापर पॅकिंग किंवा वस्त्रोद्योग क्षेत्रात करण्याच्या पद्धती देखील मुरा टेक्नॉलॉजी किंवा संसारा इको या कंपन्यांनी शोधल्या आहेत. अगदी प्लास्टिक जाळले तरी देखील ते पर्यावरण पूरक होते. जळलेल्या प्लास्टिक मधून हायड्रोकार्बन काढून घेतले जातात आणि त्या राखेतून नवे पदार्थ तयार होतात, असे संशोधन फोर्टनमने केले आहे.

भारतात रिसायकलिंगचे पुनरुज्जीवन

भारत हा प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात जगात आघाडीवर आहे. भारतात निर्माण होणाऱ्या ५५ लाख टन प्लास्टिक कचऱ्यापैकी ६० टक्क्यांवर पुनर्प्रक्रिया होते. या संदर्भातील जागतिक सरासरी केवळ ९% आहे, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२२ च्या आकडेवारीत म्हटले आहे‌. कचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि उत्पादकांची वाढीव जबाबदारी यानुसार आता २०२७ पर्यंत ५०% प्लास्टिकचा फेरवापर आवश्यक असल्याने अनेक नवकल्पनांची निर्मिती होत आहे. अनेक स्टार्टअप तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज सारखे मोठे उद्योग या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून रस्त्यांपासून ते बांधकामाच्या साहित्यापासून ते कपड्यांपर्यंत नवनिर्मिती करीत आहेत. उदाहरणार्थ रिलायन्सच्या रिरूट या उपक्रमाने एक लाख टनांहून जास्त प्लास्टिक, टिकाऊ रस्ते करण्यासाठी वापरले आहे. प्लास्ट इंडिया फाउंडेशन च्या म्हणण्यानुसार २०३० पर्यंत एक लाख किलोमीटरचे प्लास्टिक साहित्याने तयार झालेले रस्ते बनवण्याचे भारताचे ध्येय आहे. त्याच्याशी सुसंगत असाच हा प्रयत्न आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज, फेरवापराच्या प्रयत्नात आघाडीवर

रिलायन्स इंडस्ट्रीज हा भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह पुनर्वापरातून तयार केलेल्या वस्तूंच्या साहाय्याने पर्यावरणपूरकतेची व्याख्या बदलून टाकत आहे. कंपनीचे रेक्रॉन, ग्रीन गोल्ड हे ब्रँड तर, वापरलेल्या शीतपेयाच्या प्लास्टिक बाटल्यांपासून आकर्षक कपडे आणि घरगुती साहित्य बनवण्यासाठी उच्च दर्जाचे पॉलिएस्टर आणि अन्य साहित्य तयार करतात. यासाठी वर्षभर ते दोन अब्ज प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करतात. त्यामुळे नव्या पॉलिस्टर निर्मितीच्या तुलनेत २५ % वायूप्रदूषण कमी होते.

त्याचप्रमाणे लाकडाला पर्याय म्हणून वापरण्यात येणाऱ्या रेलहूड या साहित्यामुळे, आता फर्निचरमध्ये लाकडाचा वापर केला जात नाही. त्यामुळे जंगलतोड तर वाचतेच पण पाऊस वाऱ्यामुळे एरवी नेहमीच्या लाकडाची होणारी झीजही या प्रकारच्या फर्निचरमध्ये होत नाही.

रिलायन्सच्या रिरूट उपक्रमामुळे एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या भयावह कचऱ्यापासून रस्ता निर्मितीचे साहित्य बनवणे सोपे झाले आहे. यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने महापालिका तसेच स्वयंसेवी संस्थांची सहकार्य करून रस्तेत मजबूत केले आहेतच. पण डांबराच्या खर्चातील आठ ते दहा टक्के खर्चही वाचवला आहे.

औद्योगिक व्यापारासाठी सर्क्युरेपोल आणि सर्क्यूरेलेन या रासायनिकदृष्ट्या पुनर्वापर केलेल्या पीपी आणि पीई पॉलिमर मधून आयएससीसी प्लस प्रमाणित साहित्य तयार होते. ते वाहन निर्मिती आणि पॅकेजिंग क्षेत्रात वापरले जाते. रिलायन्स इंडस्ट्रीज ची जामनगर रिफायनरी ही भारतातील आयएससीसी प्लस अशी पहिली प्रमाणित व्यवस्था असून तेथे दरवर्षी दहा लाख टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

शरिरातील प्लास्टिक सूक्ष्मकणांचा धोका अनाठायी ?

हल्ली मानवी शरीरात आढळणारे प्लास्टिक सूक्ष्मकण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक बाबत बरीच चर्चा केली जाते. मात्र याबाबतही इकॉनॉमिस्टने संयम बाळगण्याचा इशारा दिला आहे. प्लास्टिकचे काही सूक्ष्मकण मानवी शरीरात जातात, असे सांगितले जाते. पण माता-बालकांच्या ८०० जोड्यांचा इकॉनॉमिस्टने अभ्यास केल्यावर त्यांना याबाबत असा कोणताही ठाम पुरावा आढळला नाही. उलट लेझर किरणांच्या साह्याने घेतलेल्या नव्या शोधावरून असे दिसून आले की, मानवी शरीरातील बहुतांश प्लास्टिकचे सूक्ष्मकण हे, नैसर्गिक पचन- उत्सर्जन व्यवस्थेवाटे सुरळीतपणे शरिराबाहेर पडतात. मानवी शरीरात प्लास्टिकचे सूक्ष्मकण आढळले म्हणजे ते धोकादायक आहेतच असे नव्हे. उलट मानवी शरीरात आढळलेले शिसे आणि प्लास्टिकचे सूक्ष्मकण यांना विनाकारण एकाच तराजू तोलले जाते, असेही इकॉनॉमिस्टने म्हटले आहे. याबाबत हॉलंड तसेच ऑस्ट्रिया येथे सुरू असलेल्या अभ्यासानंतर शरीरातील प्लास्टिक सूक्ष्मकणांच्या हानीबाबतच्या तर्कांना पुढील वर्षी विराम मिळेल अशी चिन्हे आहेत.

प्लास्टिकच्या स्मार्ट भविष्याचा आराखडा

इकॉनॉमिस्टच्या अभ्यासात दाखवलेला मार्ग हा अनुकरणीय नक्कीच आहे. डम्पिंग ग्राउंड चे व्यवस्थापन नीट केल्यास तो चांगला तात्पुरता पर्याय होऊ शकतो. मात्र नव्या प्लॅस्टिक वर कर लावल्याने किंवा कचरा व्यवस्थापन पद्धती मधील सुधारणांमुळे २०४० पर्यंत प्लास्टिक कचऱ्याच्या गैरवस्थापनात ९०% घट होऊ शकते, असे एका अभ्यासात दाखवून दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने प्लास्टिक पुनर्वापराचे जे लक्ष्य ठेवले आहे, ते साध्य करण्याकरता ६९ राष्ट्रे एकत्र आली आहेत. यातून हेच दिसते की अगदी चीन किंवा तेल उत्पादक देश बरोबर आले नाहीत तरीही, या क्षेत्रातही जागतिक एकमत शक्य आहे.

या सर्वांमधून एकच निष्कर्ष निघतो की, प्लास्टिकचा वापर होतच राहणार ही चांगली बातमी आहे. इकॉनॉमिस्टच्या अंतिम निष्कर्षानुसार प्लास्टिक वर बंदी घातली तर उलट त्याच्या पर्यायांमुळे जास्त प्रदूषण निर्माण होईल, पर्याय शोधण्यासाठी जास्त खर्च होईल. त्या पर्यायांमुळे पुन्हा असमान असमतोल निर्माण होईलच. या सर्वांपेक्षा प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे सोपे आणि स्वस्त ठरेल. प्लास्टिक ऐवजी जुने काचेचे जार वापरणे हा पर्याय नाही. तर उलट प्लास्टिकचा वापर योग्य रिसायकल पद्धतीने आणि प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीने करणे हेच सर्वांसाठी फायद्याचे आहे.

मुख्य निष्कर्ष

प्लास्टिक हा आपला शत्रू नाही तर त्याची योग्य विल्हेवाट न लावणे हा आपल्यासमोरील मुख्य धोका आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या प्लास्टिक पुनर्वापर तंत्राने आणि व्यवहार्य धोरणामुळे हे जादुई प्लास्टिक पृथ्वीच्या आरोग्याशी सुसंगत होईल.

logo
marathi.freepressjournal.in