नवी दिल्ली : ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन १.७५ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.
ऑगस्टमध्ये स्थानिक महसूल ९.२ टक्क्याने वाढून तो १.२५ लाख कोटी झाला. वस्तू आयातीतून मिळणारा जीएसटी १२.१ टक्क्याने वाढून तो ४९,९७६ कोटी झाला. तसेच २४,४६० कोटी रुपये परतावा देण्यात आला. २०२४ मध्ये आतापर्यंत ९.१३ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले, तर २०२३ मध्ये जीएसटी संकलन ८.२९ लाख कोटी रुपये झाले होते.