४८ हजार कोटींची GST तूट भरून निघेल; खरेदीत वाढ झाल्यास महसुलात वाढ होईल; ४.४ टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य पूर्ण करणार : अर्थमंत्री

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीत वाढ झाल्यास महसुलात वाढ होऊन विविध वस्तूंवरील करदरात कपात झाल्यानंतर अंदाजे ४८,००० कोटी रुपयांची झालेली जीएसटी तूट भरून निघेल. त्यामुळे सार्वजनिक वित्तव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, परंतु जीडीपी वाढीला निश्चितच चालना मिळेल. तसेच ४.४ टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य पूर्ण केले जाईल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीत वाढ झाल्यास महसुलात वाढ होऊन विविध वस्तूंवरील करदरात कपात झाल्यानंतर अंदाजे ४८,००० कोटी रुपयांची झालेली जीएसटी तूट भरून निघेल. त्यामुळे सार्वजनिक वित्तव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, परंतु जीडीपी वाढीला निश्चितच चालना मिळेल. तसेच ४.४ टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य पूर्ण केले जाईल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.

जीएसटी सुधारणा आणि अपेक्षेपेक्षा चांगल्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीमुळे आर्थिक वर्ष २६ साठी ६.३-६.८ टक्क्यांच्या अंदाजित गतीपेक्षा जास्त वाढ होण्यास मदत होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला.

जीएसटी दर कपातीचा वित्तीय तुटीवर होणाऱ्या परिणामाबद्दल विचारले असता सीतारामन म्हणाल्या की, ४८,००० कोटी रुपयांचा आर्थिक परिणाम हा आधारभूत वर्षावर आधारित स्थिर आकडा आहे. मला वाटते की २२ सप्टेंबरपासून जीएसटी दर कपात लागू झाल्यानंतर ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी वाढल्यामुळे महसुलात वाढ होईल. मोठ्या प्रमाणात, ४८,००० कोटी रुपयांची ही रक्कम आपण या वर्षीच भरून काढू शकू. त्यामुळे मला माझ्या वित्तीय तूट किंवा माझ्या वित्तीय व्यवस्थापनावर परिणाम दिसत नाही. मी माझ्या आकडेवारीवर (जीडीपीच्या ४.४ टक्के) चिकटून राहीन, असे सीतारमण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

केंद्राचा अंदाज आहे की २०२५-२६ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ४.४ टक्के किंवा १५.६९ लाख कोटी रुपये असेल.

गेल्या आठवड्यात, सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने ५ टक्के आणि १८ टक्के कर, तसेच ४० टक्के स्लॅबची द्विस्तरीय रचना मंजूर केली. २२ सप्टेंबर रोजी नवरात्राैत्सवाच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीमध्ये फेरबदल लागू झाल्यानंतर साबणांपासून ते कार, शॅम्पूपासून ते ट्रॅक्टर आणि एअर कंडिशनरपर्यंत जवळजवळ ४०० उत्पादने कमी किमतीत बाजारात उपलब्ध होतील. वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावरील भरलेले प्रीमियम करमुक्त असतील.

सरकारचे रुपयावर ‘चांगले लक्ष’

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सरकार विनिमय दरांवर चांगले लक्ष ठेवून आहे, असे सांगत त्यांनी भर दिला की रुपयाव्यतिरिक्त इतर अनेक चलनांचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाले आहे. रुपयाची घसरण मुख्यत्वे डॉलरच्या तुलनेत आहे. जागतिक स्तरावर डॉलर ज्या पद्धतीने मजबूत झाला आहे त्यामुळेही हे घडले आहे, असे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शुक्रवारी ८८.३८ च्या दिवसभरातील नीचांकी पातळी गाठल्यानंतर रुपया नीचांकी पातळीवर घसरला आणि डॉलरच्या तुलनेत ८८.२७ वर बंद झाला.

लोकांसाठी केल्या सुधारणा

जीएसटीच्या या ऐतिहासिक सुधारणाला लोकांसाठी सुधारणा असे म्हणत सीतारामन म्हणाल्या की, विविध उत्पादनांसाठी दरांचे तर्कसंगतीकरण प्रत्येक कुटुंबाला फायदेशीर ठरेल. ही एक सुधारणा आहे जी सर्व १४० कोटी लोकांच्या फायद्याची आहे. या देशातील असा कोणताही व्यक्ती नाही, जो जीएसटीपासून बाजूला आहे. गरीबातील गरीब व्यक्तीकडेही जीएसटीमुळे खरेदी केलेल्या काही ना काही छोट्या वस्तू आहेत, असे त्या म्हणाल्या.

जीडीपी आणखी वाढण्याची अपेक्षा

चालू आर्थिक वर्षात वापरात वाढ आणि पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त जीडीपी ७.८ टक्के असल्याने जीडीपी वाढीच्या अंदाजात वाढ होऊ शकते का? असे विचारले असता, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, शक्य आहे, खूप शक्य आहे. जानेवारीमध्ये संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात आर्थिक वर्ष २६ साठी वास्तविक आर्थिक वाढ ६.३-६.८ टक्के राहण्याचा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढ प्रामुख्याने कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे झाली आणि व्यापार, हॉटेल, वित्तीय आणि रिअल इस्टेटसारख्या सेवांनीही त्याला मदत केली.

logo
marathi.freepressjournal.in